अमरावती - अमरावतीत शुक्रवारी घोषित झालेल्या CBSC च्या बारावीच्या परीक्षेत अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूलचा विद्यार्थी श्रेणिक सकला हा 98 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात टॉपर ठरला आहे. बारावीच्या परीक्षेत टॉपर राहायचे, हे ध्येय बाळगून श्रेणी मोठे यश संपादन केले आहे. आपल्या या यशाचा आनंद व्यक्त करत श्रेणिक सकला याने ईटीव्ही भारतशी बोलताना बारावीच्या परीक्षेसाठी केलेल्या तयारीचे गुपित उलगडले आहे.
NCRT च्या पुस्तकातून केला अभ्यास - बारावीच्या परीक्षेचा संपूर्ण अभ्यास NCRT च्या पुस्तकातून केला आहे. भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित या विषयाचे प्रश्नसंच मी नियमित सोडवत असतं. शारीरिक शिक्षण आणि इंग्रजी हे 2 विषय माझ्यासाठी नवीन होते. या दोन्ही विषयांचा अभ्यास NCRT च्या पुस्तकांमधून केला. इंग्रजी विषयाचे प्रश्नसंच मी नियमितपणे सोडविले. CBSC च्या वतीने जी प्रश्नपेढी दिली जाते. ती संपूर्ण प्रश्नपेढी सोडवत. माझ्या अभ्यासासाठी माझ्या महर्षी पब्लिक स्कूलच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आई- वडिलांनी देखील मला अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले असे श्रेणिक चकला सांगत आहे.
भविष्यात संगणक अभियंता बनायचे -सध्या आयआयटीची तयारी सुरू आहे. भविष्यात संगणक अभियंता बनायचे असून, डेटा सायन्सच्या मदतीने समाज झगडत असलेल्या अनेक अडचणी समस्यांचा तोडगा मला काढायचा आहे, असे देखील श्रेणिक यांनी सांगितले आहे.
अभ्यासासाठी मोबाईल घेतला हाती थोडाफार टीव्ही पाहिला -कोरोना काळात मी बराचसा अभ्यास मोबाईल फोनद्वारे ऑनलाईन केला. आता बारावीचा अभ्यास करताना देखील मोबाईल फोनवर इंटरनेटद्वारे उपलब्ध माहितीचा मला पुष्कळचा लाभ झाला. बारावीचे हे महत्त्वपूर्ण वर्ष असल्यामुळे मी विशेष असा टीव्ही पाहिला नाही. मात्र रोज रात्री अर्धा तास एखाद्या आवडीचा कार्यक्रम नियमित पाहत होतो, असे श्रेणिक यावेळी म्हणाला.
श्रेणीकच्या घरात आनंदोत्सव -श्रेणिकचे वडील मोहन सकला हे शेतकरी असून, आई निशा या गृहिणी आहेत. श्रेणिकची बहिण श्रेया ही यावर्षी इयत्ता अकरावीला आहे. श्रेणीचे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण शाश्वत शाळेत झाले असून, अकरावीला त्याने महर्षी पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला. बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात टॉपर आल्यावर श्रेणीच्या घरात आनंदोत्सवासारखे वातावरण निर्माण झाले आहे.
या विद्यार्थ्यांनी मिळवले यश -सीबीएससी ने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत अमरावती शहरात खुशी कासट या विद्यार्थिनीने 97 टक्के गुण मिळविले. तर छबी खेमुका या विद्यार्थिनीने 96.2% गुण मिळवून यश संपादन केले आहे. अथर्व जलतारेला 95.2%, हार्दिक अलसिंघानी 94.8%, मिहीर गुजरकर 94.6%, अद्वैत काम 94.4%, निमिश मनावरे 94.4%, यश भट्टड 93.8%, यामिनी तसरे 93. 8%, अथर्व सावजी 93.2%, साई टोपले 93%, अजिंक्य राऊत 92%, अभिराम धर्मे 92%, शशांक डागा 91.8%, आयुष लेढ्ढा 91.2%, प्रचिती पळसकर 90.6%, मृण्मयी पानट 96%, प्रणव खंडेलवाल 95%, परिमल दानखेडे 95.4%, गुण मिळवून गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
हेही वाचा -Dhol Tasa Tradition: 'तरुणाईच्या उत्साहामुळे ढोल- ताशा उद्योगाला भरभराट, कधी कशी सुरू झाली?, ढोल ताशा पथकांची परंपरा