अमरावती - 'जिल्ह्यामध्ये पाय ठेवताना दादागिरी आणि भाईगिरी लांबच ठेऊन यायचं भाऊ.. अमरावतीमध्ये जो कायद्यात राहणार तोच फायद्यात राहणार.. कारण कस आहे ना. कायद्याचा बालेकिल्ला ओन्ली अमरावती जिल्हा' असा एक व्हिडिओ अमरावतीच्या चांदुर बाजार पोलीस स्टेशनचे कर्मचारी महेश काळे यांनी तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ चित्रपटातील एखाद्या सिनला ही लाजवेल असा असल्याने काही तासातच तो तुफान व्हायरल झाला. परंतु, हा व्हिडिओ तयार करताना या कर्मचाऱ्याच्या अंगात खाकी वर्दी व बंदूक सदृश्य शस्त्र असल्याने त्याच्यावर गैरवर्तणूक, बेजबाबदारपणा व वर्दीचा गैरवापर याचा ठपका ठेऊन त्याला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांनी निलंबित केले आहे. हे निलंबन मागे घ्यावे यासाठी नेटकऱ्यांनी सोशलमीडियावर पोलीस कर्मचारी महेश काळे यांच्या समर्थनार्थ मोहीम सुरू केली आहे.
निलंबन मागे घेण्याची नेटकऱ्यांची मागणी -
पोलीस कर्मचाऱ्याने व्हिडिओमध्ये गैर काहीच नसून हा व्हिडिओ कायद्याचेच समर्थन करणारा व गुन्हेगारांना चाप देणारा असल्याचे सांगत नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोलीस कर्मचारी महेश काळे यांच्या समर्थनार्थ मोहीम चालू केली आहे. या कर्मचाऱ्याचे निलंबन मागे घेण्याची मागणीही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केली आहे. #we support mahesh kale, #we support amravati police असा हॅशटॅग ही वापरण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये काहीच गैर नाही नेटकऱ्यांचे म्हणणे -