अमरावती - 'दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया' ( The Institute of Chartered Accounts of India ) कडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेमध्ये येथील मिलन लाहोटी ही विद्यार्थिनी देशात चौथी आली आहे. तर हर्षिल केवळरामानी हा पाचवा रिद्धी कलंत्री 43 वी रँक मिळाली आहे. अमरावती शहरातील ( Amravati city ) एकूण 3 विद्यार्थी गुणवत्ता यादीत ( Student merit list ) आले आहेत. तर शहराभारतातून 25 विद्यार्थ्यांनी सीएची परीक्षा ( CA Exam ) उत्तीर्ण केली आहेत.
सनदी लेखापाल ( सीए ) ची परीक्षा यावर्षीच्या मे महिन्यात घेण्यात आली होती. राष्ट्रीय स्थरावर ( national stage ) होणाऱ्या या परीक्षेत देशभरातून लाखो विद्यार्थी परीक्षा देत असतात. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार मीनल लाहोटी ही देशातून चौथी, हर्षित केवळरामानी हा पाचवा तर रिद्धी कलंत्री ही देशातून 43 व्या रँकवर आली आहे.
आई- वडिलांचीच प्रेरणा -माझ्या कुटुंबातील कोणीही वित्त क्षेत्रात नाही. परंतु, मला या क्षेत्रात येण्याची खूप इच्छा होती. माझे वडील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहे, तर आई शिक्षिका आहे. आई- वडिलांच्या प्रोत्साहनामुळे मी यश गाठू शकली. कुटुंबाने मला खूप मानसिक आधार दिला. असे मीनलने यावेळी सांगितले आहे.