अमरावतीदृष्टिहीन व्यक्ती व्हाट्सअप, फेसबुक, युट्युब अशा सोशल मीडियाचा वापर करत असेल का ? असा प्रश्न सर्वसामान्यांना नक्कीच भेडसावतो. तिवसा येथील गटसाधन केंद्रात विषय साधन व्यक्ती पदावर कार्यरत असणारे 42 वर्षीय प्रवीण रामटेके हे जन्मतः शंभर टक्के अंध असताना, देखील सोशल मीडियावर सक्रिय आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून अनेक स्पर्धा परीक्षेत त्यांनी मोठी झेप घेतली आहे.
दृष्टिहीन असूनही सोशल मीडियात प्रवीणमूळचे अमरावतीचे रहिवासी असणारे प्रवीण रामटेके हे लहानपणी शाळेत असताना टेपरे कार्डवर कॅसेट रेकॉर्ड करून अभ्यास करायचे. आज मात्र स्मार्ट मोबाइलचा आधार घेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास ते करत आहेत. वोक्यालायझर व्हॉइस, इटीलॉन्स, टी टी एस सारख्या अँड्रॉइड ॲप्सच्या माध्यमातून ते मोबाईल अगदी सहज हाताळतात. फेसबुक व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम, युट्युब असे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवीण रामटेके यांचे अकाउंट आहे. अद्यावत माहितीसाठी ते या सर्व सोशल मीडियाचा नियमित वापर करतात. कार्यालयीन काम करण्यासाठी वाईस माध्यमातून वर्ल्ड एक्सेल आणि विविध ऑफिशियल सॉफ्टवेअर ते हाताळतात. याच माध्यमातून तंत्रज्ञानाचे धडे गिरवत, त्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. युट्युबवर एका चॅनलला फॉलो करून स्टाफ सिलेक्शन रेल्वे बँकिंग मधील अनेक प्री व मेन्स परीक्षा त्यांनी दिल्या असून रेल्वे आणि बँकेच्या मुलाखती देखील त्यांनी दिल्या आहेत. सरासरी गुणवत्तेच्या अभावी त्यांची बँकेतील नोकरी थोडक्यात हुकली असून येणाऱ्या परीक्षेत आपण यशस्वी होऊ अशी जिद्द प्रवीण रामटेके यांनी कायम बाळगली आहे.
'एमएससीआयटी' च्या माध्यमातून प्राप्त केले तंत्रशिक्षणMSCIT च्या माध्यमातून अंध व्यक्तींसाठी असणारे विशेष तंत्रशिक्षण प्रवीण रामटेके यांनी अवगत केले आहे. नाशिक येथे अंध व्यक्तींसाठी MSCIT चे विशेष प्रशिक्षण दिले जाते. यामुळे 2008 मध्ये प्रवीण रामटेके यांनी नाशिक येथे जाऊन MSCIT चे विशेष प्रशिक्षण प्राप्त केले. संगणकातील सर्व प्रोग्राम त्यांनी स्क्रीन रेकॉर्डर आणि वोक्यालायझर व्हाईसच्या द्वारे अवगत केले आहे. आज संगणक असो किंवा अँड्रॉइड फोन असो प्रवीण रामटेके हे अगदी सहजरीत्या हाताळतात.
गरीब परिस्थितीतून घेतला शिक्षणाचा ध्यासआई वडील चार भाऊ आणि एक बहीण अशा मोठ्या- मोठ्या कुटुंबात प्रवीण रामटेके यांची जडणघडण झाली. कुटुंबाच्या गरीब परिस्थितीतून त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. सुरुवातीच्या काळात अमरावती शहरातील डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथे शिक्षण घेतल्यावर जिल्हा परिषदच्या सायन्स कोर शाळेतून ते इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले. घरची परिस्थिती हलाखीची असताना आणि अंगी असलेल्या दिव्यांगत्वाचा बाऊ न करता जिद्दीने गुजरात आणि राजस्थान सारख्या राज्यात जाऊन डीएड आणि बीएड हे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. यासह पदव्युत्तर पदवी देखील त्यांनी संपादन केली. डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर विद्यालयात शिकताना अनेक कला हस्तगत करून चार पैशांचे अर्थार्जण त्यांनी केले आहे. जगण्यासाठी पैसे पुरेसे नसल्याचे लक्षात येत आज त्यांनी स्पर्धा परीक्षेकडे मोर्चा वळविला 2006 मध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी स्वरूपाची नोकरी स्वीकारत कुटुंबाचा उदरनिर्वाहाची व्यवस्था त्यांनी केली आहे. आज देखील विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी उंच झेप घेण्याचा प्रयत्न प्रवीण रामटेके यांचा सुरू आहे.