महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजप महिला आघाडीने केला राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांचा निषेध - भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा अमरावती

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा अमरावती शहराच्या अध्यक्ष रिता मोकलकर यांच्या नेतृत्वात बुधवारी भाजप महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला.

भाजप महिला आघाडी
भाजप महिला आघाडी

By

Published : Mar 5, 2020, 5:06 AM IST

अमरावती - सुनेचा छळ करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांचा महिलांच्या प्रति आपुलकी प्रेम असणारा बेगडी मुखवटा जगासमोर आला आहे. विद्या चव्हाण सारख्या महिलेकडून राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारकीचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी अमरावती शहर भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

भाजप महिला आघाडीने केला राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांचा निषेध
भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा अमरावती शहराच्या अध्यक्ष रिता मोकलकर यांच्या नेतृत्वात बुधवारी भाजप महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण' या उक्तीप्रमाणे विद्या चव्हाण यांचे चरित्र असून आपल्या सुनेचा छळ करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांना आपल्या सुनेबाबत आक्षेपार्ह विधान करणे शोभत नाही. महिलांच्या प्रती वेगळी भूमिका घेणाऱ्या विद्या चव्हाण यांच्याकडून त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप पहिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी उपमहापौर कुसुम साहू, नगरसेवक जयश्री डहाके, सुचिता बिरे, शिल्पा पाच घरे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details