अमरावती -शहरात हिंसाचार झाल्यानंतर आज सायबर क्राईमचा धक्कादायक अहवाल हाती आला आहे. यात भाजप प्रणित हिंदुत्त्ववादी संघटनेचा हात असल्याचा अहवाल दिसून येत आहे, यावर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी अमरावतीत संतप्त प्रतिक्रिया दिली. हा सादर झालेला अहवाल खोटा असून महाराष्ट्र कुठंही दंगल झाली तर महाविकास आघाडी सरकार खोटा अहवाल सादर करतात. भाजपच्या माथी दंगल लावतात, असा आरोप भाजपचे शिवराय कुळकर्णी यांनी केला तर राज्य सरकारने झालेल्या घटनेची चौकशी करावी, कोणाला तरी जबाबदार धरणे अमरावतीच्या अस्मितेचा अवमान करणं आहे तर लोकांचे संरक्षण करणे हे आमची जबाबदारी आहे, अशीही प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यात कुठंही दंगल झाली तर त्याचे खापर भाजपच्या माथी फोडण्याचे महाविकास आघाडी सरकारचे काम - भाजप - अमरावती दंगल
अमरावती दंगलीत भाजप प्रणित हिंदुत्त्ववादी संघटनेचा हात असल्याचा अहवाल दिसून येत आहे, यावर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी अमरावतीत संतप्त प्रतिक्रिया दिली. हा सादर झालेला अहवाल खोटा असून महाराष्ट्र कुठंही दंगल झाली तर महाविकास आघाडी सरकार खोटा अहवाल सादर करतात. भाजपच्या माथी दंगल लावतात, असा आरोप भाजपचे शिवराय कुळकर्णी यांनी केला.

Amravati riots
पत्रकारांशी बोलताना भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी
त्रिपुरा राज्यात कथित अत्याचाराविरोधात अमरावतीत (Amravati violence) 12 नोव्हेंबरला दुपारी एका समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 ते 20 हजार लोकांसह निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण मिळाले होते. यात शहरातील पाच ते सात दुकानांची तोडफोड झाली व काही दुकानदारांना मारहाण करण्यात आली. याच्या निषेधार्थ 13 नोव्हेंबरला भाजपकडून अमरावतीत बंद पुकारण्यात आला होता. या बंदलाही हिंसक वळण लागल्याचे चित्र बघायला मिळाले. सध्या अमरावती शहरातील वातावरण शांत आहे. मोठा पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे.
अमरावती शहरात दोन दिवस झालेल्या हिंसाचारात तब्बल 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Last Updated : Nov 17, 2021, 7:11 PM IST