अमरावती -शहरातीलहिंचाचाराला (amravati violence) जबाबदार असणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी भाजप (bjp) नेत्यांची धरपकड सुरू केली असून भाजपचे नेते आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde), भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि नगरसेवकतुषार भारतीय (Tushar Bhartiya) यांना अटक केली आहे.
शहर कोतवाली पोलिसांनी केली कारवाई
शनिवारी (दि. 13 नोव्हेंबर) शहरात निर्माण झालेला तणाव प्रकरणात पोलिसांनी माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह माजी मंत्री आणि विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे, भाजप प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, तुषार भारतीय यांसह भाजपच्या काही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज (दि. 15) शहर कोतवाली पोलिसांनी डॉ. अनिल बोंडे यांना सकाळी अटक केली तर दुपारी तुषार भारतीय यांनाही अटक केली आहे. प्रवीण पोटे आणि शिवराय कुलकर्णी या दोघांचा पोलीस शोध घेत आहे.