महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजप नेते कपिल मिश्रा आज उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांना भेटणार, 30 लाख रुपयांची करणार मदत - BJP leader Kapil Mishra will visit Amravati

अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे ( Umesh Kolhe murder case Amravati ) यांची हत्या झाली होती. या प्रकरणातील सात आरोपींना एनआयएने ताब्यात घेतले असून आठव्या आरोपीचा शोध सुरू. या हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. कोल्हे यांच्या कुटुंबीयांची ( BJP leader Kapil Mishra will meet Umesh Kolhe family ) भेट घेण्यासाठी आज दिल्ली येथील भाजपचे नेते कपिल मिश्रा ( BJP leader Kapil Mishra will visit Amravati ) अमरावतीत येणार आहे.

BJP leader Kapil Mishra will meet Umesh Kolhe family
भाजप नेते कपिल मिश्रा आज उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांना भेटणार

By

Published : Jul 7, 2022, 9:32 AM IST

अमरावती - अमरावती शहरातील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे ( Umesh Kolhe murder case Amravati ) यांच्या हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अशात आज दिल्ली येथील भाजपचे नेते कपिल मिश्रा ( BJP leader Kapil Mishra will meet Umesh Kolhe family ) अमरावतीत उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. कपिल मिश्रा ( BJP leader Kapil Mishra will visit Amravati ) यांच्या वतीने कोल्हे कुटुंबीयांना 30 लाख रुपयांची मदत देखील केली जाणार आहे. कपिल मिश्रा साडेअकरा वाजता कोल्हे यांच्या घरी पोहचणार आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सातही आरोपींना एनआयएने आपल्या ताब्यात घेतले असून, काल या सर्व सातही आरोपींना ( Umesh Kolhe murder case accused NIA custody ) अमरावतीवरून मुंबईत हलविण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणात आठवा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा शोध सुरू आहे.

हेही वाचा -Umesh Kolhe PM Report : उमेश कोल्हेंचा पीएम रिपोर्ट; कॅरोटीन धमनी कापल्याने मृत्यू, राज्यभरात अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन

न्यायालयीन लढाई लढण्यासाठी मदत करणार - भाजपचे नेते कपिल शर्मा हे सकाळी साडेअकरा वाजता अमरावती शहरातील लोकमान्य कॉलनी परिसरात असणाऱ्या उमेश कोल्हे यांच्या घरी पोहचणार आहे. या प्रकरणात कोल्हे यांना न्यायालयीन लढाई लढण्यासाठी देखील मदत केली जाणार असल्याचे कपिल मिश्रा यांनी ट्विट केले आहे.

उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा समर्थनार्थ केली होती पोस्ट : पशूंच्या औषधांचे विक्रीचे दुकान उमेश कोल्हे हे अमरावती तहसील परिसरात चालवत होते. डॉक्टर युसुफ खान हा त्यांच्याकडून नियमित औषधे खरेदी करायचा. उमेश कोल्हे यांच्यासोबत त्याची बऱ्यापैकी ओळख झाल्यामुळे कोल्हे यांनी त्याला अनेकदा आर्थिक मदत केल्याचीही माहिती समोर आली असून, त्याच्याकडे उधारीची बरीच मोठी रक्कम थकीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. असे असताना आपल्या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. डॉक्टर युनूफ खान याने उमेश कोल्हे यांनी शेअर केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून इतर ठिकाणी त्या शेअर केल्या होत्या.

असा रचला हत्येचा कट : यानंतर शेख इरफान शेख रशीद याने उमेश कोल्हे यांच्या हत्येचा संपूर्ण कट रचला. या कटात शोएब खान, मुदलीस अहमद, आतिफ रशीद, अब्दुल तोफिक, शाहरुख पठाण आणि डॉक्टर युसुफ खान हादेखील सहभागी झाला. यानंतर उमेश कोल्हे हे आपले औषधीचे दुकान कधी उघडतात, कधी बंद करतात ते कोणत्या मार्गाने घरी जातात याची संपूर्ण माहिती शेख इरफान शेख रशीद यांनी काढली. यानंतर 21 जूनच्या रात्री साडेदहाच्या सुमारास उमेश कोल्हे हे औषधीचे दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाले.

दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी साधला डाव : उमेश कोल्हे यांच्यासोबतच दुसऱ्या दुचाकीवर त्यांचा मुलगा आणि सून हेदेखील होते. श्याम चौक परिसरातील घंटी घड्याळलगत त्यांची दुचाकी अडवून त्यांचा गळा चिरण्यात आला. उमेश कोल्हे यांच्या दुचाकीच्या मागे काही अंतरावर असणारा त्यांचा मुलगा आणि सून हे घटनास्थळी पोहचताच त्यांना उमेश कोल्हे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. उमेश कोल्हे यांच्या मुलाने परिसरातील काही व्यक्तींच्या मदतीने लगतच्या खासगी रुग्णालयात उमेश कोल्हे यांना उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कनेक्शन : नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्यांना जिवे मारण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही कनेक्शन आहे का? याचा तपास आता सुरू झाला आहे. उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल याची हत्यादेखील नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच घडली होती. यासह अमरावती शहरातील ज्या व्यक्तींनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केली त्यांना त्वरित माफी मागावी, अशी धमकी मिळाली असल्यामुळे अनेकांनी माफीदेखील मागितली आहे. शेख इरफान शेख रहीम हा एका संघटनेचा पदाधिकारी असल्याचे समोर आले असून, त्याच्या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावरून पैसा पुरवण्यात आला आहे का? याचा तपास देखील केला जाणार आहे.

हेही वाचा -Anandrao Adsul : शिवसेनेला मोठा झटका! शिवसेना नेतेपदाचा राजीनामा, आनंदराव अडसूळ शिंदे गटात जाणार?

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details