अमरावती -भाजपने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. असे असताना काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपवाले एका महिलेच्या पाठीमागे लागले आहेत. हा आरोप साफ चुकीचा आहे. एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेल्या मंत्र्याकडून आम्ही राजीनामा मागत आहोत, असे प्रत्युत्तर भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांनी काँग्रेसकडून होणाऱ्या आरोपांवर दिले आहे. आंदोलनस्थळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काँग्रेसला उत्तर दिले आहे.
हेही वाचा -जसं नाईक यांचं प्रकरण उघडलं तसं आता परमार आणि इतरांच्या पेंडिंग केसेस उघडाव्या - आशिष शेलार
सात दिवसांपासून सुरू आहे आंदोलन -
2012 मध्ये शहरातील गांधी चौक परिसरात एकेरी मार्ग असताना यशोमती ठाकूर यांचे वाहन घुसल्याने वाहतूक पोलीस शिपाई विलास वराळे यांनी हटकले असताना त्यांना यशोमती ठाकूर आणि त्यांच्या वाहनातील दोघांनी मारहाण केली होती. या प्रकरणात यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 ऑक्टोबरला ठाकूर यांना दोषी ठरवले. न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपने यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असून, सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भाजपचे आंदोलन सुरू आहे.
काँग्रेसच्या आमदारांना आमची भूमिका पटली असेल