महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Banana Festival: 'केळीचा उत्सव' अंजनगाव सुरजी परिसरातील शेतकरी झाले समृद्ध

Banana Festival: जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. Banana Festival 2007 मध्ये अंजनगाव सुर्जी येथे उत्सव बनाना रायपनिंग सेंटर Utsav Banana Ripening Centre सुरू झाले आणि दलालांच्या कचाट्यातून मुक्त होऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव Banana farmers मिळू लागल्याने या भागातील केळी उत्पादक आता समृद्ध झाले आहेत.

Banana Festival
Banana Festival

By

Published : Oct 14, 2022, 8:02 PM IST

अमरावतीजिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. Banana Festival 2007 मध्ये अंजनगाव सुर्जी येथे उत्सव बनाना रायपनिंग सेंटर Utsav Banana Ripening Centre सुरू झाले आणि दलालांच्या कचाट्यातून मुक्त होऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव Banana farmers मिळू लागल्याने या भागातील केळी उत्पादक आता समृद्ध झाले आहेत.

अंजनगाव सुरजी परिसरातील शेतकरी झाले समृद्ध

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी झाली मदतअंजनगाव सुरजी परिसरात 2007 मध्ये गौरव नेमाडे या युवा शेतकऱ्याने केळी पिकवण्यासह त्यांना जतन करून ठेवण्यासाठी अत्याधुनिक अशा खास सेंटरची निर्मिती केली. या सेंटरच्या माध्यमातून केळी उत्पादकांचा माल खरेदी करून, तो त्यांच्या शेतातून कापणी करून थेट या सेंटरवर आणण्याची जबाबदारी गौरव नेमाडे यांनी घेतली. यामुळे शेतकऱ्यांना होणारा दलालांचा त्रास थांबला. उत्कृष्ट दर्जाच्या केळीसाठी योग्य मोबदला आणि तोही तात्काळ शेतकऱ्यांना मिळू लागला.

केळी पिकवून 3 दिवसात बाजारातउत्सव बनाना रॅपलिंग सेंटरवर अंजनगाव सुर्जी आणि लगतच्या परिसरातील शेतकऱ्यांची केळी घेऊन त्यांना 48 तासापर्यंत पिकवले जाते. अवघ्या 3 दिवसात शेतकऱ्यांची केळी स्थानिक बाजारपेठेसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात तसेच लगतच्या राज्यांमधील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवले जातात. अनेकदा या परिसरातील शेतकरी आपली केळी पिकविण्यासाठी ठरलेली रक्कम या सेंटरवर भरून 3 दिवसात पिकलेली आपली केळी घेऊन स्वतः हव्या त्या बाजारपेठेत विकतात. आपली केळी सुरक्षित राहण्यासोबतच त्यांना योग्य भाव मिळत असल्यामुळे या परिसरातील केळी उत्पादक शेतकरी समृद्ध होतो आहे.

आधी ऊस आता केळीला महत्त्वअंजनगाव सुर्जी आणि लगतच्या परिसरात पूर्वी उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जायचे. 2007 मध्ये अंजनगाव सुर्जी येथे बनाना रॅपलिंग सेंटर सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना केळीसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध व्हायला लागल्यामुळे या भागातील शेतकरी ऊस ऐवजी मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घ्यायला लागले.

अशी आहे केळी पिकवण्याची प्रक्रियाया सेंटरमध्ये एकूण 5 वातानुकूलित चेंबर आहेत. एका चेंबरची कॅपिसिटी ही अडीच हजार कॅरेटची आहे. एक कॅरेट हे 24 किलोचे आहे. या चेंबरमध्ये ठेवली जाणारी केळी ही नायट्रोजन गॅसच्या सहाय्याने पिकवली जातात. यामध्ये मेंथोलचेही प्रमाण असते. केंद्र शासनाची याला मान्यता असून यासाठी मोठे सिलिंडर या सेंटरमध्ये लावण्यात आले आहे. एका चेंबरमध्ये नेमके केळीचे किती कॅरेट ठेवले आहे. त्यानुसार नायट्रोजन गॅसचा वापर केला जातो. 1000 कॅरेटसाठी 2 मिनिटांचा नायट्रोजन गॅस लागतो. 500 कॅरेट असेल तर 4 मिनिटांचा गॅस लागतो. जितके अधिक कॅरेट असतील तितका गॅस कमी लागतो. कोणत्या व्यक्तीला पिवळी केळी हवीत हिरवी केळी हवीत, अशा त्यांच्या मागणीप्रमाणे या चेंबरचे वातावरण ठेवले जाते. अशी माहिती या सेंटरचे तांत्रिक प्रमुख विजय बोडके यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details