महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लिपची आयुक्तांमार्फत चौकशी करू - बाळासाहेब थोरात - amravati latest news

तहसीलदार ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात

By

Published : Aug 20, 2021, 9:18 PM IST

Updated : Aug 20, 2021, 10:16 PM IST

अमरावती - पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची क्लीप पूर्ण तपासून त्याची चौकशी आयुक्तांमार्फत केली जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमरावतीमध्ये दिली आहे.

आत्महत्येची धमकी

तहसीलदार ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तहसीलदार देवरे यांनी ऑडिओ क्लिपमध्ये कुणाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही, मात्र त्यांचा रोख हा पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याकडे असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चौकशीचे आदेश

महिला आयोगामध्येही तक्रार दाखल झाली आहे. त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. महिला आयोगाचे एम. डी. ही त्यांची चौकशी करत आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये दिली आहे.

Last Updated : Aug 20, 2021, 10:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details