अमरावती -अमरावती शहरात तणाव (amravati violence) निर्माण केल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या माजी पालकमंत्री डॉ.अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे यांसह भाजपच्या (bjp) एकूण 14 जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.
याने त्यांना मिळाली जमानत
शनिवारी शहरात तणाव निर्माण करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी सातच्या सुमारास भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अटक केली होती. माजी पालक मंत्री डॉ. अनिल बोंडे भाजपचे जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांना रविवारी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना आज (सोमवार) सकाळी अटक केली होती. महापौर चेतन गावंडे आणि तुषार भारतीय, भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनाही दुपारी पोलिसांनी अटक केली. सायंकाळी सर्वांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दरम्यान, भाजपच्या नेत्यांची बाजू अॅड. प्रशांत देशपांडे यांनी न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाने प्रशांत देशपांडे यांच्यासह सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेतल्यावर डॉ. अनिल बोंडे, प्रवीण पोटे, शिवराय कुळकर्णी, निवेदिता चौधरी, महापौर चेतन गावंडे, नगरसेवक तुषार भारतीय यांसह एकूण 14 जणांचा जामीन मंजूर केला.