अमरावती -अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान विज्ञान महाविद्यालयात गैरकारभार ( Balapur ACS College Mismanagement ) होत असल्याचा आरोप करत महाविद्यालयाचे संचालक मंडळाने केला आहे. तसेच याची माहिती विद्यापीठाच्या निदर्शनात देखील आणून दिली. मात्र, यासंदर्भात कोणतीही कारवाई न झाल्याने या संचालक मंडळातील काही सदस्य संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठासमोर ( SGBAU ) उपोषणाला बसले. याठिकाणी राज्यमंत्री बच्चू कडू ( Bacchu Kadu Visit SGBAU Campus ) यांनी भेट दिली. यावेळी कुलसचिव हेंमत देशमुख ( Hemant Deshmukh ) यांच्यावर हयगय केल्याचा आरोप करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांना चांगलेच फटकारले आहे. 'मी राज्यमंत्री आहे म्हणून सांगा नाहीतर, आत येऊन ठोकले असते', असा दम ( Bacchu Kadu Threat Hemant Deshmukh ) बच्चू कडू यांनी हेंमत देशमुख यांना दिला.
काय आहे प्रकरण-