महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Navratri 2022 : कुळदेवीचा तांदळाचा मुखवटा घडवून अष्टमीला पूजन, चित्पावन ब्राह्मण संघाचा विधी - कुळदेवीचा तांदळाचा मुखवटा घडवून अष्टमीला पूजन

चित्पावन ब्राह्मण संघाच्यावतीने अष्टमीच्या पर्वावर रविवारी रात्री दरोगा प्लॉट येथील ब्राह्मण सभेत आयोजिय सोहळ्यात आपल्या कुलदेवतेचा तांदळाचा मुखवटा (Ashtami puja by making rice mask) घडवून तिचे विधिवत पूजन केले. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण समाजातील (Kuldevi Chitpavan Brahmin Sangha Ritual) हा सर्वात मोठा आणि मनाचा उत्सव धार्मिक विधिसह साजरा करण्यात आला.

Navratri 2022
चित्पावन ब्राह्मण संघाचा विधी

By

Published : Oct 3, 2022, 7:26 PM IST

अमरावती :चित्पावन ब्राह्मण संघाच्यावतीने अष्टमीच्या पर्वावर रविवारी रात्री दरोगा प्लॉट येथील ब्राह्मण सभेत आयोजिय सोहळ्यात आपल्या कुलदेवतेचा तांदळाचा मुखवटा (Ashtami puja by making rice mask) घडवून तिचे विधिवत पूजन केले. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण समाजातील (Kuldevi Chitpavan Brahmin Sangha Ritual) हा सर्वात मोठा आणि मनाचा उत्सव धार्मिक विधिसह साजरा करण्यात आला.

देवी पुढे नाच-गाणे सादर करतांना महीला


असा असतो विधी :चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण मूळ कोकणातील सर्वांची कुलदैवत ही कोकण परिसरात किंवा आंबेजोगाईला आहे. सकाळी अष्टमी पूजनाची सुरुवात सुवासिनीने एकत्रितपणे देवीच्या पूजनाने होते. याप्रसंगी सुवासिनी आपल्या लग्नाला जितकी वर्ष झाली त्याप्रमाणे 'खडे' घेऊन त्याचे पूजन करतात. या पूजनाला पंचामृति पूजनाचे स्वरूप असते. ज्या यजमानाने त्यावर्षीच्या अष्टमी पूजनाच्या आयोजनाचे यजमान पद स्वीकारले असते. त्यांच्या इथल्या सुवासिनी, पूजेला आलेल्या सर्व सुवासिनींचे त्यांच्या पायावर दूध पाणी टाकून तसेच पायाला कुंकू लावून त्यांना ओवाळतात. बारा वाजता आरती नंतर पुरणाच्या पोळीचे जेवण असते. संध्याकाळी तिन्हीसांजेला तांदुळाच्या पिठी पासून अष्टमीचा मुखवटा म्हणजे चेहरा तयार करण्यात येतो ही अत्यंत पुरातन कला असून,कोकणामध्ये तांदूळ हे प्रमुख धान्य असल्यामुळे तांदुळाच्या पिठी पासून उकड घेऊन त्यापासून देवीच्या शरीरावर बसवण्यासाठी मुखवटा तयार केला जातो. तिने सांजेला हा मुखवटा देवीच्या शरीरावर बसवल्यानंतर देवीची आरती केली जाते. अनेक वर्षांपासून अष्टमीच्या दिवशी अनेक स्त्री-पुरुषांच्या अंगात देवीचा संचार होतो. घागरी फुंकण्यासाठी या सर्व संचार झालेल्या व्यक्ती अष्टमी समोर येतात. राळ आणि उद याच्या धुरापासून उजवलेल्या घागरी त्या व्यक्तींच्या हातात असतात. यासोबतच भजन, आरत्या म्हटल्यामुळे एक प्रकारचा भारावलेला वातावरणाचा अनुभव सर्वांना मिळतो. अनेक जण या संचार झालेल्या व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन त्यांच्यासमोर आपली मनोकामना व्यक्त करतात व त्या पूर्ण होण्यासाठी काय करावे हे विचारतात.


देवीसमोर खेळ :फुगड्या,फेर धरणे, इत्यादी देवीसमोर खेळ केल्या जाऊन देवीचा जागर केला जातो. रात्री बारा वाजता अंगात आलेल्या व्यक्तींचा संचार समाप्त होतो, पुन्हा आरती केल्या जाते, व या मुखवटाचे विधिवत विसर्जन केल्या जातं. संध्याकाळपासून अनेक लोक दर्शनासाठी व प्रसाद घेण्यासाठी येतात. चित्पावन ब्राह्मणांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, साने गुरुजी यांच्यासारखे समाज सुधारक होऊन गेले तरीही या समाजाने आपली धार्मिक आस्था कधीही सोडली नाही धर्माचा व देशाचा आदर हे त्यांच्या जीवनाचे मूलतत्त्व आहे. अष्टमीच्या दिवशी झाडून सर्व लोक देवीच्या दर्शनाला येतात अशी माहिती चित्पावन ब्राह्मण संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग पाठक यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details