अमरावती -भारतीय उपखंडात मध्यभागात असलेल्या सातपुडा पर्वत रांगेत ( Ashmayug Drawing Found at Satpura Mountain Range ) अश्मयुगीन मानवी संस्कृती विकसित झाली होती. यासंदर्भातील पुरावे हाती लागले असून या भागात असणाऱ्या शैल गुहांमध्ये ( Ashmayug Human Culture ) असणारी शैल चित्रे या परिसरातील प्राचीन संस्कृतीला उजाळा देत असल्याची माहिती संशोधक डॉ. विजय इंगोले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
35 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास -
अमरावती शहरापासून अवघ्या साठ किलोमीटर अंतरावर मोर्शी शहरापासून जवळच असणाऱ्या सातपुडा पर्वतरांगेत 27 जानेवारी 2007 रोजी पहिल्यांदाच डॉ. विजय इंगोले यांच्या पथकाला शैल चित्रे आढळून आली होती. पद्माकर लाड, ज्ञानेश्वर दम, डॉ. मनोहर खोडे, शिरीष कुमार पाटील आणि प्रदीप हिरुरकर हे या शोध पथकात सहभागी होते. या परिसरात 2018पर्यंत या चमूची शोधमोहीम सुरू होती. तब्बल अकरा वर्षाच्या संशोधनानंतर या परिसरात 35 हजार वर्षांपूर्वी मानवी वस्ती होती, याचा पुराव्यानिशी इतिहासाचा शोध लागला.
शहामृगसह झेंडा आणि जिराफचे होते वास्तव्य -
सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या धारूळ गावालगत 300 पेक्षा अधिक शैलगृह हे आढळून आली आहेत. या शैलगृहात 100 पेक्षा अधिक शैल चित्र आणि कोरीव चित्रे आहेत. या चित्रांचा अभ्यास केला असता, इसवी सन पूर्व 35 हजार वर्षांपूर्वी शहामृग या पक्षासह गेंडा, जिराफ सदृश्य प्राणी या परिसरात होते, असे संशोधनाअंती निष्पन्न झाले आहे. तसेच मध्य अश्मयुगीन काळात ईसा पूर्व 1000 वर्षापूर्वी या भागात बाईच्या प्राण्याच्या चित्रासह योनी आणि भैरव यांच्या चित्रांसह युद्ध चित्रे कोरण्यात आल्याचेही संशोधनात समोर आले असल्याचे डॉ. विजय इंगोले म्हणाले.
भैरव आणि योनीची व्हायची पूजा-