अमरावती -अर्धांगवायूच्या आजारावर आयसीयू विभागात उपचार घेणाऱ्या एका ७१ वर्षीय रुग्णाच्या शरीराच्या विविध भागांवर मुंग्यांनी चावा घेतल्याचा (Ants attack Patients Body) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय (Dr Panjabrao Deshmukh Hospital Amravati) येथे घडला आहे. विष्णूपंत साठवने असे या ७१ वर्षीय रुग्णांचे नाव आहे.
- रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह -
साठवने यांना काही दिवसांपूर्वी अर्धागवायूचा झटका आला होता. अशातच बुधवारी त्यांना सायंकाळी उपचारासाठी अमरावती शहरातील प्रसिद्ध डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान आज सकाळी त्यांच्या शरीराच्या विविध भागांवर लाल मुंग्यांनी चावा घेतला. यामध्ये विष्णुपंत साठवने यांच्या एका डोळ्याखाली तसेच गुप्तांग भागाला जखमा झाल्या आहेत. सकाळी रुग्णाच्या नातेवाईकांचे लक्ष गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. लगेच त्यांनी एका कापडाने त्या सर्व मुंग्या पुसून काढल्या. या संपूर्ण घटनेने मात्र आरोग्य यंत्रणा किती बेफिकीर आहे हे समोर आलं आहे.
- नर्सला नोटीस जारी-