अमरावती -परिस्थितिचे गांभीर्य लक्षात न घेता असेच हातावर हात देऊन उभे राहलो तर तीस वर्षानंतर तुमच्या मुलींनाही इतर देशा प्रमाणे बुरखा घालावा लागेल असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते अनिल बोंडे यांनी केले आहे. (Anil Bonde Spoke on Hijab) ते अमरावती येथे एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील मंदिर सुरक्षित
छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला, तुळजापूरची भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली असे म्हणत अयोध्या, मथुरा व काशी विश्वनाथ येथे चित्र वेगळे आहे. (Anil Bonde On hijab) कारण जिथे शिवाजी महाराज नव्हते, तिथे मंदिराच्या बाजूला मशिद तयार झाली. असेही बोंडें म्हणाले. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष मोठ्या अभिमानाने करावा असे यावाहनही डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.