महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 7, 2022, 7:49 AM IST

Updated : Jul 7, 2022, 1:46 PM IST

ETV Bharat / city

Anandrao Adsul : शिवसेनेला मोठा झटका! शिवसेना नेतेपदाचा राजीनामा, आनंदराव अडसूळ शिंदे गटात जाणार?

माजी खासदार आनंदराव अडसूळ ( Former MP Anandrao Adsul ) यांनी शिवसेना नेतेपदाचा ( Shiv Sena leader ) राजीनामा ( Resigned ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याकडे पाठवला आहे. उद्धव ठाकरे यांना अजूनही शिवसेनेतली त्यांच्याकडील नेत्यांची गळती रोखण्यात यश येईना, कारण रोज एक नवा नेता ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होत आहे.

शिवसेना नेतेपदाचा राजीनामा, आनंदराव अडसूळ
शिवसेना नेतेपदाचा राजीनामा, आनंदराव अडसूळ

अमरावती -अडचणीच्या वेळी आपली साधी विचारपुसही न केल्याच्या कारणावरून नाराज असलेले माजी खासदार आनंदराव अडसूळ ( Former MP Anandrao Adsul ) यांनी शिवसेना नेतेपदाचा ( Shiv Sena leader ) राजीनामा ( Resigned ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याकडे पाठवला आहे. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासह ३९ आमदारांनी बंड केल्यानंतरही जिल्हात सेनेचा गड मजबूत होता. परंतु, माजी खासदार अडसूळ यांच्या राजीनाम्याने खिंडार पडल्याचे दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे यांना अजूनही शिवसेनेतली त्यांच्याकडील नेत्यांची गळती रोखण्यात यश येईना, कारण रोज एक नवा नेता ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होत आहे. आता आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ शिंदे गटात जाणार का? अशा राजकीय चर्चांणा उधाण येत आहे. अडसूळ हे अमरावतीचे माजी खासदार आहेत. गेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांच्याविरोधात त्यांना हार पत्करावी लागली होती.

९८० कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणात ईडीने दिले होते समन्स -सिटी सहकारी बँकेच्या ९८० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत यांना सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) चौकशीचा समन्स बजावले होते. तसेच त्यांच्या कांदिवली येथील घर आणि कार्यालयातही ईडीने छापे टाकले होते.

काय आहे प्रकरण -आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी 27 सप्टेंबरला त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना 'ईडी'ने समन्स पाठवलं होतं. 27 तारखेला सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास ‘ईडी’ने त्यांना ताब्यात घेतलं.

कर्ज वाटपात अनियमिततेचा आरोप -आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ‘ईडी’ त्यांची चौकशी करणार आहे. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि एनपीएमध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली, पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

हेही वाचा -Uddhav Thackeray : 'तुम्हाला देण्यासारखं आता माझ्याकडे काही नाही'; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन

Last Updated : Jul 7, 2022, 1:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details