गणरायाच्या मूर्तीसोबत मोफत कुंडी; अमरावतीत पर्यावरणप्रेमी मुर्तीकाराची भाविकांना भेट - environmental awareness in amravati
पर्यावरणप्रेमी मूर्तीकार निलेश कंचनपुर यांनी मातीच्या गणपती मूर्ती सोबतच मातीची एक कुंडी भेट म्हणून भाविकांना देत पर्यावरण संवर्धनासाठी अनोखा संदेश दिला आहे. गणपतीचे विसर्जन घरीच एका टपात करावे व विसर्जनानंतर टपातील गणरायाच्या मूर्तीची माती कुंडीत टाकून त्यात एक झाड लावावे असा संदेश दिला आहे.
मुर्ती घ्या, कुंडी मोफत
अमरावती- शहरातील एका मूर्तीकाराने पर्यावरण संवर्धनासाठी गणेशोत्सवाच्या निमीत्ताने अनोखा संदेश दिला आहे. प्रत्येक घरात मातीची मूर्ती स्थापन व्हावी या उद्देशाने मूर्तीकाराने श्रींच्या मूर्ती सोबतच मातीची एक कुंडी भेट स्वरूपात देण्याचा उपक्रम राबविला आहे. गणपती विसर्जनानंतर मूर्तीची माती या कुंडीत लावून त्यात आपल्या गणरायाची आठवण म्हणून एक झाड लावावे असा संदेशही हा युवा मूर्तीकार देत आहे.