महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमरावतीच्या भातकुली तालुक्यात 80 वर्षीय वृद्धाची डोक्यात लोखंडी रॉड मारून हत्या - हत्या

भातकुली तालुक्यातील मौजे दाढी या गावात एका 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीची डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

अमरावती वृद्ध व्यक्तीची हत्या
अमरावतीत वृद्धाची हत्या

By

Published : Feb 7, 2020, 6:33 AM IST

अमरावती - जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात मौजे दाढी या गावात नारायण काळे या ऐंशी वर्षीय वृद्ध व्यक्तीची डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शेतीच्या वादातून त्यांच्याच नातलगाने ही हत्या केली असल्याचे उघड झाले आहे.

भातकुली तालुक्यातील मौजे दाढी गावात वृद्ध व्यक्तीची हत्या...

हेही वाचा... "हिंगणघाट पीडितेच्या डोळ्यांची सूज कमी मात्र श्वसन यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता"

अमरावती जिल्ह्यातील भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे दाढी या गावातील नारायण काळे यांची त्यांच्या नात्यातील स्वप्निल खरपे याने हत्या केली. शेतीच्या वाटणीच्या वादातून डोक्यात खरपे यांने काळे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्यांची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. स्वप्नील खरपे याच्यावर भातकुली पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हत्येनंतर स्वप्निल खरपे हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

शेतीच्या वादातून झालेल्या या हत्येनंतर गावातील लोक एकत्र आले होते. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच सर्वांसोबत बातचीत करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

हेही वाचा... ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: भोगावती नदी वाळूप्रकरणी चौकशी पूर्ण; मात्र, अहवालात गौडबंगाल

ABOUT THE AUTHOR

...view details