अमरावतीधारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा काकरमल शाळेतील शिक्षकाने दुपारी शाळेत हजर विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य करणे सोडून शाळेला सुटी झाल्याचे सांगितले व मस्त दारू पिऊन खुर्चीवर झोप घेऊन तेथेच लघुशंका केली आहे. त्याची ही अवस्था बघण्याकरिता विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून आणले. पालकांनी या शिक्षकाचा समाचार घेतला असता. तो उलट पालकावरच दादागिरी करत होता. त्याची व्हिडिओ शूटिंग काढून व त्याची लेखी तक्रार पालकांनी त्याच्यावर कारवाई करण्याकरिता धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांना दिली आहे.
असे आहे प्रकरणधारणी पंचायतमधील शिक्षण विभागा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा काकरमल येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. तेथे गावातील 200 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना विद्या दानाचे कार्य करण्याकरता एकूण 4 शिक्षक शाळेत कार्यरत असून त्यापैकी एक शिक्षका प्रसूती रजेवर आहे. अन्य 3 शिक्षक शाळेत कार्यरत असतात. शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान 3 पैकी एक सहायक शिक्षक पृथ्वीराज नेत्रराम चव्हाण वय 38 हा शाळेत दारू पिऊन आला व त्याने त्याच्या वर्गातील विद्यार्थांना आज शाळेला सुटी असल्याचे सांगितले.
झोपेतच लघुशंका केलीविद्यार्थांना बाहेर हाकलून दिले. स्वतः वर्गातील खुर्चीवर बसून टेबलवर पाय ठेवून तेथे झोपला. झोपेतच लघुशंका केली त्यादरम्यान वर्गातील विद्यार्थ्यांनी त्याची ही अवस्था बघितली व स्वतःच्या पालकांना शाळेत बोलावून आणले. त्यावेळी उपसरपंच अशोक कासदेकर पालक वर्ग सुरेंद्र पटोरकर, भुरेलाल बेठेकर शाळा वयवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जांभेकर उपाध्यक्ष नंदलाल जावरकर हे शाळेत पोहचले. शाळेत शिक्षक पृथ्वीराज चौहान हा दारूच्या नशेत खुर्चीवर बसून टेबलवर पाय ठेवून तेथेच लघुशंका केलेल्या अवस्थेत आढळला. पालकांनी त्याला झोपेतून उठवल्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकवता, आज सुटी का दिली अशी विचारणा केली असता. तो त्यांच्यावरच दादागिरी करत होता.