महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amravati Wall Collapse : अमरावतीत कुटुंबीयावर काळाचा घाला! भिंत कोसळून मायलेकीचा मृत्यू, 3 मृत्यू - Amravati Rain

Amravati Wall Collapse : अमरावीतीमध्ये भिंत कोसळून दुर्घटना, एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू

फुबगाव येथे पावसामुळे घर कोसळले
फुबगाव येथे पावसामुळे घर कोसळले

By

Published : Jul 19, 2022, 9:32 AM IST

अमरावती -मुसळधार पाऊस ( Heavy rain ) कोसळत असल्यामुळे जिल्ह्यातील ( Amravati district ) चांदूरबाजार ( Chandurbazar ) तालुक्यात येणाऱ्या फुगाव येथील एक घर कोसळले असून या घटनेत 2 जण ठार झाले आहे. तर 2 गंभीर जखमी झाले आहेत.

फुगाव येथे पावसामुळे घर कोसळले

चांदूरबाजार तालुक्यातीलफुगामध्ये खळबळ - गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस ( Heavy rain ) कोसळत असल्यामुळे फुगाव येथील अरुण वैराळे यांचे घर अचानक कोसळले आहे. या घरात एकूण 5 जण राहतात. घर कोसळताच घरातील हे पाचही जण ढिकाऱ्याखाली अडकले आहे. ढिगाराखाली दबल्याने चंदा अरुण वैराळे ( वय- 35 ) आणि त्यांची मुलगी पायल अरुण वैराळे ( वय- 7 ) यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ग्रामस्थांनी तिघांना बाहेर काढण्यात यश मिळविले आहे. तिघांची प्रकृती अतिशय गंभीर असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आपत्ती नियोजन पथक गावात दाखल -पावसामुळे घर कोसळल्याने फुगाव येथे 2 जण ठार झाले असताना आपत्ती नियोजन पथक गावात पोहोचले आहे. गावातील जी घरे कोसळण्याच्या स्थितीत आहे, अशा सर्वांना घर सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांची व्यवस्था इतरत्र केली जात आहे.

पावसाने जिल्ह्यातील ८८० हेक्टरमधील पिकांची नासाडी -गेल्या दोन-तीन दिवसातील जोरदार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. शेतीलाही याचा फटका बसला आहे. १४ पैकी सहा तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. चांदूरबाजार वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये घरांची पडझड झाली आहे.

८८० हेक्टरमधील पिके पावसामुळे खराब झालीत -अमरावती जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील ८८० हेक्टर शेती खराब झाली असून, ३६९ घरांची पडझड झाली आहे. यापैकी नऊ घरे पूर्णत: पडली असून, ३६० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान दर्यापूर तालुक्यात झाले. या तालुक्यातील ५५५ हेक्टरमधील पीक खराब झाले. त्याखालोखाल १२० हेक्टर शेती पिके धामणगाव रेल्वे तालुक्यात खराब झाली असून, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ९२, वरुड तालुक्यातील ७८, मोर्शी तालुक्यातील २० आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १५ हेक्टरमधील शेती पिके खराब झालीत. अशाप्रकारे जिल्ह्याच्या सहा तालुक्यातील ८८० हेक्टरमधील पिके पावसामुळे खराब झाली आहेत.

मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात मोठे नुकसान -गेल्या चार दिवसांपासूनच्या पावसामुळे जिल्ह्यातील १२१ गावांमध्ये कहर झाला. धामणगाव रेल्वे, भातकुली आणि तिवसा तालुक्यातील अनुक्रमे २७, २३ आणि २२ गावांमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले. त्यामुळे अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली. या अतिवृष्टीमुळे ३६९ घरांची पडझड झाली. यापैकी अमरावती व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रत्येकी तीन तर वरुड, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील प्रत्येकी एक अशाप्रकारे नऊ घरे पूर्णत: कोलमडली. तर ३६० घरांना अंशत: फटका बसला. अंशत: फटका बसलेल्यांमध्ये सर्वाधिक ८७ घरे तिवसा तालुक्यातील असून भातकुली तालुक्यातील ७६, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ५१, अमरावती तालुक्यातील ४९ तर दर्यापूर तालुक्यातील ३३ गावांचा समावेश आहे. गेल्या दोन-तीन दिवसांतील पावसामुळे जिल्ह्यात एक व्यक्ती वाहून गेला. मृत व्यक्ती अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आहे.

हेही वाचा -CM Eknath Shinde In Delhi : आमच्याकडे १२ नव्हे १८ खासदार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीत गौप्यस्फोट

ABOUT THE AUTHOR

...view details