महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमरावती युनियन बँक घोटाळा, शाखा व्यवस्थापकासह चौघांना अटक - Amravati Union Bank Scam

अमरावतीमध्ये युनियन बँकेतील लॉकर्समध्ये तब्बल ५४०० ग्रॅम बनावट सोने (Amravati Union Bank Scam) आढळल्याप्रकरणी सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेने बॅंकेच्या तत्कालिन शाखा व्यवस्थापकासह चार जणांना अटक केली. युनियन बॅंकेकडून दोन दिवसांपूर्वी लेखापरिक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींचे चेहरे स्पष्ट झाले (Branch Manager four others Arrested). संशयितांना सोमवारी चौकशीकरीता पाचारण करण्यात आले होते.

अमरावती युनियन बँक घोटाळा
अमरावती युनियन बँक घोटाळा

By

Published : Sep 20, 2022, 4:40 PM IST

Updated : Sep 20, 2022, 9:58 PM IST

अमरावती -युनियन बँकेतील लॉकर्समध्ये तब्बल ५४०० ग्रॅम बनावट सोने आढळल्याप्रकरणी सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेने बॅंकेच्या तत्कालिन शाखा व्यवस्थापकासह चार जणांना अटक केली (Amravati Union Bank Scam). पोलीस कोठडीदरम्यान, या घोटाळ्याची व्याप्ती उघड होणार आहे. आरोपींची संख्या वाढण्याचे संकेत तपास यंत्रणेने दिले आहेत. शहरातील काही सुवर्णकारदेखील पोलिसांच्या रडारवर आहेत.

सोमवारी संपूर्ण दिवसभर चौकशी -राजापेठस्थित युनियन बॅंकेचा तत्कालिन व्यवस्थापक जतीन प्रेमचंद कुंद्रा (३४, रा. अजमेर, राजस्थान), गौरव पुरूषोत्तम शिंदे (४२, महादेवखोरी, अमरावती), पवन अरूण तांडेकर (३४, हमालपुरा, अमरावती) व सतीश भोजने (३६, हमालपुरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत (Branch Manager four others Arrested). त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, सोमवारी संपूर्ण दिवसभर चौकशी केल्यानंतर सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली. त्यांना राजापेठ ठाण्यातील हवालतीत ठेवण्यात आले आहे. युनियन बॅंकेकडून दोन दिवसांपूर्वी लेखापरिक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींचे चेहरे स्पष्ट झाले. संशयितांना सोमवारी चौकशीकरीता पाचारण करण्यात आले.

असे आहे प्रकरण -शहरातील आचल विहार कॉलनी येथील उज्ज्वल मळसने यांनी युनियन बँकेतून १०० ग्रॅम सोन्याचे दागिने तारण ठेवून त्यावर ३.३० लाख रुपये कर्ज घेतले होते. ६ ऑगस्ट रोजी तारण असलेले सोन्याचे दागिने पाहिले असता, ते बनावट असल्याचे दिसले. त्यावरून बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या ५.५० लाख रुपयांच्या दागिन्यांचा अपहार केल्याची तक्रार मळसने यांनी केली. सबब, राजापेठ पोलिसांनी १२ ऑगस्ट रोजी यूबीआयच्या स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तो गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर बँकेकडून गोल्ड लोनबाबतचा ऑडिट रिपोर्ट मागविण्यात आला. मात्र, बँकेकडून तो देण्यास टाळाटाळ व टोलवाटोलवी करण्यात आली.

Last Updated : Sep 20, 2022, 9:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details