महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एस.टी. प्रवाशांना दिलासा; यंदाच्या दिवाळीत भाडेवाढीतून सुटका, जादा बसचीही सोय

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तिकीटदरात वाढ न करण्याच्या निर्णयानंतर दिवाळीसाठी अमरावतीतून जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यासाठी जास्त फेऱ्या असलतील तर इतर जिल्ह्यासह आंतरराज्यीय सेवाही देण्यात आली आहे.

यंदाच्या दिवाळीत भाडेवाढीतून सुटका
यंदाच्या दिवाळीत भाडेवाढीतून सुटका

By

Published : Nov 4, 2020, 4:01 PM IST

Updated : Nov 4, 2020, 4:37 PM IST


अमरावती - दरवर्षी दिवाळी सणाच्या काळात एस टी महामंडळकडून होणारी तिकिटांची दरवाढ यंदा रद्द करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळाने हा निर्णय घेतला. महामंडाळाच्या या दिलासादायक निर्णयानंतर अमरावतीच्या प्रवाशांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिवाळीत होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एस टी महामंडळाच्या वतीने अमरावती आगारातून दिनांक ११ ते २१ नोव्हेंबर या दहा दिवसांत जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एस.टी. प्रवाशांना दिलासा
पुण्यावरून अमरावतीसाठी दररोज ५ बस येणार-अमरावती जिल्ह्यातील अनेक चाकरमाने हे पुण्यात नोकरीला आहे. त्यानिमित्ताने पुण्यावरुन दरवर्षी मोठ्या प्रमाणात बस या अमरावतीसाठी सोडण्यात येतात. परंतु यावर्षी दररोज ५ बस सोडण्यात येणार आहेत. तर दिवाळी नंतर अमरावतीवरून पुण्याला परत जाण्यासाठी दररोज ८ बसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांची गर्दी लक्षात घेता आणखी बसची संख्या वाढवली जाण्याची शक्यताही अमरावती एसटी विभागाकडून सांगण्यात आली आहे.
इतर जिल्हे आणि महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्यांसाठी सुविधा-


दिवाळी काळात महाराष्ट्रातील मराठवाडा, जळगाव खान्देश, बीड, अंबेजोगाई, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, आदी जिल्ह्याकरीताही जादा बसची सेवा पुरविण्यात येणार आहे. तसेच आंतरराज्यीय सेवे अंतर्गत मध्यप्रदेश मधील भोपळ, खंडवा, आदी जिल्ह्यात जादा बस सोडण्यात येणार आहेत.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी बस-

मागील वर्षात दिवाळीला एसटी महामंडाळा प्रवाशांचा प्रतिसाद पाहता एस टी कडून पुण्यावरून येण्यासाठी ५० जादा बस लावण्यात आल्या होत्या. तर अमरावती वरून पुण्याला जायला ८० बस होत्या. परंतु यंदा कोरोनामुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यावरून १५ ते २० तर पुण्याकडे जाण्यासाठी ५० ते ६० गाड्यांचे नियोजन केले असल्याची माहिती अमरवती एसटी विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली आहे.

Last Updated : Nov 4, 2020, 4:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details