महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेसचा विचार घेऊन नव्या रक्ताची पिढी पुन्हा तयार होईल - बाळासाहेब थोरात

भाजप सरकारने जनतेची जी फसवणूक केली, त्याविरोधात जनजागृती म्हणून सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेसने पोलखोल यात्रा काढली आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.

काँग्रेसच्या यात्रेबद्दल बोलताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

By

Published : Aug 27, 2019, 8:46 AM IST

Updated : Aug 27, 2019, 10:00 AM IST

अमरावती -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेते नाना पटोले, आमदार यशोमती ठाकूर यांनी सोमवारी अमरावतीत मोझरी गुरूकुंज येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. भाजप सरकारने जनतेची जी फसवणूक केली, त्याविरोधात जनजागृती म्हणून सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेसने पोलखोल यात्रा काढली आहे, अशी प्रतिक्रीया यावेळी थोरात यांनी दिली.

काँग्रेसचा विचार घेऊन नव्या रक्ताची पिढी पुन्हा तयार होईल - बाळासाहेब थोरात

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विचार घेऊनच काँग्रेस काम करत आहे - बाळासाहेब थोरात

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भूमि ही पवित्र भूमि आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने ग्रामविकासाचा विचार केला. त्यांनी लिहलेली ग्रामगीता ही समाजपयोगी अशी साहित्य रचना आहे. आजही देशातील कोणत्याही प्रतिनिधीने ग्रामगीता वाचायला पाहिजे, ग्रामविकासाचे धडे त्यातून मिळेल. अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे त्यात आहे. पुरोगामी विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मांडले, तोच विचार काँग्रेसने स्विकारला आहे.

भाजप सरकारच्या धोरणाने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला - बाळासाहेब थोरात

भाजप सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेसची पोलखोल यात्रा - थोरात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथूनच महाजनादेश यात्रा सुरू केली. मागील पाच वर्षात लोकांचा विकास झाला नाही, दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत. व्यापारी, कामगार, शेतकरी, नोकरदार डबघाईला आले आहेत. भाजप सरकारने लोकांची जी फसवणूक केली आहे, त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही ही पोलखोल यात्रा काढत आहोत, असे थोरात यावेळी म्हणाले.

भाजपचे विचार खालच्या पातळीचे आणि अंधश्रद्धेने बरबटलेले - बाळासाहेब थोरात

जे इतर पक्षात जात आहेत त्यांना सत्तेची चटक - बाळासाहेब थोरात

दरम्यान जे नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये जात आहे, यावर बोलताना थोरात यांनी "ज्या लोकांना काँग्रेसने खूप काही दिले तेच लोक आता इतर पक्षात जात आहेत. ते प्रस्थापित आहेत पण त्यांना मुळात सत्तेची चटक असल्याने ते जात आहे. त्यांच्या जाण्यापाठीमागे कोणताही वैचारिक दृष्टीकोण नाही. परंतु, असा परिस्थितीतही काँग्रेस पुन्हा उभारी घेईल. काँग्रेस नव्याने उभी राहिल. काँग्रेसचा विचार घेऊन नव्या रक्ताची नवी पिढी पुन्हा तयार होईल, असा विश्वास थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.

गरिबांच्या खिशातले ६७ लाख रोज जातात मातोश्रीवर; नाना पटोले यांचा आरोप

Last Updated : Aug 27, 2019, 10:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details