अमरावती -अमरावती शहरात नुपूर शर्माचे समर्थन करणारे औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यातच आता सोमवारी ( 11 जुलै ) सायंकाळी एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयासमोर हत्या करण्यात आली. त्यामुळे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. विकास शंकरराव गायकवाड ( वय 17, रा. भीम नगर ) असे अल्पवयीन तरुणाचे नाव आहे.
अशी घडली घटना - विकास गायकवाड शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. सोमवारी विकास हा केशरबाई लाहोटी महाविद्यालयासमोर उभा असताना त्याचा आरोपींसोबत काही कारणावरून वाद झाला. बघता बघता वाद विकोपाला गेला व अज्ञात आरोपींनी त्याच्या शरीरात चाकू भोसकून त्याची हत्या केली.