अमरावती - काही दिवसांपूर्वी लोकसभेत खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकार व शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांना लेटरहेड पाठवून त्यांच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून, जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. तर खा. नवणीत राणा यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या अॅसिड हल्ल्याच्या धमकीवर नवनीत राणा म्हणाल्या... - amravati shivsena news
खासदार नवनीत राणा यांना लेटरहेड पाठवून त्यांच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून, जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

navneet
'संविधानाने दिला आहे अधिकार'
राणा म्हणाल्या, की मी लोकसभा सभागृहात कोरोनाकाळात ठाकरे सरकारच्या उणिवा मांडत होते. लोकांच्या समस्या मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्यामुळे मला आलेल्या धमकीसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Last Updated : Feb 16, 2021, 10:14 PM IST