अमरावती- नागपूर वरून अमरावतीच्या दिशेने जात असतांना महानगरपालिकेच्या महापौरांच्या गाडीलाचा अपघात झाला. महापौर चेतन गावंडे यांच्या वाहनाला ट्रकने धडक दिली. या अपघातामुळे गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे असून कुठलीही जीवितहानी झाली नाही.
अमरावती: महापौरांच्या गाडीला अपघात - अमरावती महापौर चेतन गांवडे
नागपूर वरून अमरावतीच्या दिशेने जात असतांना अमरावती महानगरपालिकेच्या महापौरांच्या गाडीला अपघात झाला. महापौर चेतन गावंडे हे सुखरूप आहेत.
महापौर गावंडे काल रात्री साडे नऊ वाजता नागपूर वरून अमरावतीला जात होते. दरम्यान त्यांनी तिवसा शहराच्या पेट्रोल पंप चौकात आपले शासकीय वाहन उभे केले. यावेळी नागपूर वरून येणाऱ्या भरधाव ट्रकने महापौरांच्या गाडीला धडक दिली. या घटनेचा पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे. तिवसा शहरातील पेट्रोल पंप चौक हे अपघाताचे स्थळ असून याठिकाणी खूप वेळा दुचाकी व मोठ्या वाहनाचे अपघात झाले आहेत.
ट्रक चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून महापौर यांच्यासह वाहन चालक सुखरूप आहे.