महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amravati Gutter : अमरावती तुंबण्याची भिती! अनेक नाले तुंबलेलेच, कुठे रस्त्यावर तर कुठे गाळ नाल्यांच्या काठाशीच - अमरावती लेटेस्ट न्यूज

अमरावती शहराच्या मध्यवस्तीतून एकूण 16 मोठे नाले आणि 18 नाल्यांना सुरक्षा भिंत नसल्यामुळे नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात जीव मुठीत धरून जगावे लागते. नाल्याला येणाऱ्या पुरामुळे पावसाळ्यात आर्थिक तसेच जीवित हानी होण्याची शक्यता असल्यामुळे दरवर्षी नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे ( Amravati Gutter Problems in Summer ) लागते.

Amravati Municipal Corporation
अमरावती तुंबण्याची भिती

By

Published : Jun 6, 2022, 6:14 PM IST

अमरावती -अवघ्या दोन दिवसानंतर पावसाळा लागणार असताना अमरावती शहरातील नाल्यांची सफाई ( Amravati Gutter Problems ) झाली नसल्यामुळे पावसाळ्यात अनेक भागात हाहाकार उडण्याची शक्यता आहे. नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, असे चित्र शहराच्या मुख्य परिसरात असणाऱ्या नाल्यांची अवस्था पाहून लक्षात येत आहे.

अमरावती तुंबण्याची भिती

सुरक्षा भिंती नसल्यामुळे मोठे संकट - अमरावती शहराच्या मध्यवस्तीतून एकूण 16 मोठे नाले आणि 18 नाल्यांना सुरक्षा भिंत नसल्यामुळे नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात जीव मुठीत धरून जगावे लागते. नाल्याला येणाऱ्या पुरामुळे पावसाळ्यात आर्थिक तसेच जीवित हानी होण्याची शक्यता असल्यामुळे दरवर्षी नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. सुरक्षा भिंत नसल्यामुळे पुराचे पाणी घरात शिरत असल्यामुळे अनेक भागात मोठे नुकसान होते. शहरातील सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंत असल्यास शहरातील नाला कठीण नागरिकांचे नुकसान होणार नाही. यासाठी या सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंत बांधण्यात याव्या म्हणून पाठपुरावा केला होता. या नाल्यांना सुरक्षा भिंती बांधण्यासाठी 375 कोटी 67 लक्ष रुपयांचा डीपीआर मंजूर झाला आहे. तरी सुद्धा हे काम अद्यापही झाले नसल्याची खंत माजी नगरसेवक मिलिंद बांबल यांनी व्यक्त कली.

अनेक नाले तुंबलेलेच

हेही वाचा -Monsoon In Vidarbha : विदर्भात पावसाचे आगमन लांबणीवर; पुढील दोन दिवस Heat Wave चा हवामान विभागाचा इशारा

काही ठिकाणी नाल्यांची सफाई मात्र गाळ नाल्यांच्या काठाशी -अमरावती महापालिका प्रशासनाने ( Amravati Gutter and Amravati Municipal Corporation ) शहरातील नालेसफाईचे आदेश देऊन शहरातील काही भागात नाल्यांच्या सफाईचे काम करण्यात आली. दुर्दैवाने मात्र नाल्यातील गटार कचरा काढून तो सर्व ढिगारा नाल्याच्या काठीच लावण्यात आला आहे. जोरदार पाऊस आला की नाल्याच्या काठी असणारा कचऱ्याचा हा ढिगारा पुन्हा नाल्यात वाहून जाणार आहे. यामुळे नाल्याला पूर येऊन नाल्याकाठी राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता शहरातील किरण नगर विलास नगर परिसरातून वाहणार्‍या नाल्यांची सफाई अनेक वर्षांपासून झाली नाही. या परिसरात पावसाळ्यात नाल्यांना पूर आल्यावर सर्वत्र घाण पसरते. प्रचंड दुर्गंधीचा सामना या भागातील रहिवाशांना करावा लागतो. यावर्षी सुद्धा या परिसरातील नाल्यांची अवस्था गंभीर आहे.

अनेक नाले तुंबलेलेच

अंबादेवी मंदिर परिसरात नाल्या खालचे पिल्लर मोठी समस्या - अंबा देवी मंदिर परिसरातील नाल्यावर स्लॅब टाकण्यात आलेला आहे. पावसाळ्यात नाल्यातून येणारा हा कचरा बिल्डरला अडकतो. यामुळे अंबादेवी मंदिर परिसरासह लगतच्या नमुना परिसरात सांडपाणी तुंबते. ही समस्या गत दहा वर्षांपासून कायम आहे. याबाबत कोणीही लोकप्रतिनिधी किंवा महापालिका प्रशासन गंभीर नसल्यामुळे पावसाळ्यात या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अक्षरशः हाल सहन करावे लागतात.

अनेक नाले तुंबलेलेच

या परिसरात आहे नाल्यांची समस्या -पावसाळ्यात अंबा नाल्याला पूर आल्यावर सर्वाधिक फटका नमुना परिसर तसेच अंबादेवी मंदिर परिसराला बसतो. यासह खापर्डे बगीचा परिसरातून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा परिसर घाण पाण्याने तुंबून जातो. कधी पाहते नये कपडे बगीचा लगत असणाऱ्या समाधान नगर परिसरातही पावसाळ्यात तारांबळ उडते. शहरातील वडाळी आणि छत्री तलाव येथून सुरु होणारे मुख्य नाल्यांची सफाई यावर्षी झाली नसल्यामुळे छत्री तलावाला लगतच्या जेवड नगर, दस्तुर या परिसरातील नाल्यांना पूर येण्याची भीती असून वडाळी तलावा पासून सुरू होणाऱ्या नाल्यातील घाण पाणी बिच्छू टेकडी, काँग्रेसनगर, फ्रेजरपुरा परिसरात शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -Shivsena Teaser : सत्ता असो वा नसो, आमचं हिंदुत्व तकलादू नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details