अमरावती -आदिवासी विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकावा, त्याला इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे. या करिता आदिवासी विभागाने नामांकित शाळेत इंग्रजी शिक्षण ही योजना सुरु केली. महर्षी पब्लिक स्कूलमध्ये संचालकानी आदिवासी विद्यार्थांना क्षुल्लक कारणावरून मारहाण करून वस्तीगृहातुन हाकलून दिल्याचा गंभीर प्रकार घड़ला आहे. या विरोधात विद्यार्थांनी आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे.
पोळ्या करण्याची मशीन तोडल्याने विद्यार्थ्यांना मारहाण -विद्यार्थांनी पोळ्या करण्याची मशीन तोड़ली, असा आरोप करून शाळेच्या संचालकानी आदिवासी विद्यार्थाना मारहाण करून पहाटे 4 वाजता शाळेतून हाकलून दिल्याचा प्रकार घडल्याचा विद्यार्थांनी सांगितले. संस्था संचालकाने आदिवासी विद्यार्थांना शाळेतून बाहेर काढून दिल्यानंतर विद्यार्थांनी थेट आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालय गाठुन कार्यालया समोरच दिवसभर ठिय्या आंदोलन केले आहे. आपल्यावर होत असलेला अन्यायाचा पाढ़ा अधिकार्यासमक्ष वाचून दाखविले आहेत.
आदिवासी संघटनांनी घेतली दखल -विद्यार्थाच्या तक्रारीवरुन आदिवासी विकास विभागाने समिती नेमली असून संपूर्ण घटनेची चौकशी करणार आहे. या सदर घटनेची माहिती मिळताच आदिवासी सामाजिक संघटना बिरसा क्रांती दल- जिल्हा अध्यक्ष अर्जुन युवनाते, पेसा आंदोलक गंगाराम जांभेकर, माजी आमदार केवलराम काळे यांनी कार्यकर्त्यासह थेट आदिवासी विकास अप्पर आयुक्त कार्यालय गाठून विद्यार्थाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. विद्यार्थाच्या समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनात निलेश बेठेकर, राहुल बेठेकर, राजेश सावलकर, अमित जांभेकर, देवराव धांडे, अर्पित सावलकर, रितिक भास्कर, विवेक मावस्कर, विक्की मावस्कर, गणेश जांभेकर, निर्भय धुर्वे, उमेश सावलकर, आदर्श दहिकर, रोशन जाम्भेकर, तेजस भीलवेकर, हर्षद धुर्वे, आकाश झळके, भूषण दाबेराव, संबोधन ठाकरे या मुलांसह बहुसंख्य आदिवासी विद्यार्थी आंदोलनात सहभागी होते.
वस्तीगृहातुन होतो निकृष्ट भोजनाचा पुरवठा -नामांकित महर्षी पब्लिक स्कुल येथे शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थांना शाशनाच्या मेनू नुसार जेवण दिले जात नाही. दर दिवसात डाळ, भाजी, बेसन पोळ्या दिले जाते. ते ही निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याने विद्यार्थांचे प्रकृती बिघडत आहे. अनेक विद्यार्थांना पोटदुखीचे आजार समोर आले आहेत.
भविष्य खराब करण्याची दिली जाते धमकी -महर्षी पब्लिक स्कूल येथे शिकत असलेल्या वर्ग 12 वी च्या आदिवासी विद्यार्थाना शाळेतील इतर विद्यार्थांसोबत शिकवल्या जात नाही. त्यांना वेगळ्या वर्ग खोलित शिकवले जाते. आदिवासी विद्यार्थाला फिजिक्स या विषयाचा दिवसात फक्त एकच् तास होते. आदिवासी विद्यार्थांना अध्यापही गणवेश नाही, शाळेच्या विरोधात गेल्यास टीसीवर लाल शाही मारून भविष्य खराब करण्याची धमकी देत असल्याची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली आहे.