महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amravati woman Swab Test : तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचे प्रकरण, आरोपीला 10 वर्षाची शिक्षा - amravati woman swab test marathi news

दीड वर्षापूर्वी लॅब टेक्निशियनने एका तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला ( Amravati Woman Swab Test ) होता. आता त्या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. त्या लॅब टेक्निशियनला न्यायालयाने 10 वर्षाची शिक्षा सुनावली ( Amravati Lab Technician 10 Year Imprisonment ) आहे.

Amravati woman Swab Test
Amravati woman Swab Test

By

Published : Feb 3, 2022, 11:01 AM IST

Updated : Feb 3, 2022, 11:30 AM IST

अमरावती - अमरावती येथे दीड वर्षापूर्वी तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ( Amravati woman Swab Test ) होता. कोरोना चाचणी करण्यासाठी लॅब टेक्निशियनने तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला होता. तरुणीने दिलेल्या तक्रारीननंतर आरोपीला अटक करण्यात आली होता. आता या लॅब टेक्निशियनला न्यायालयाने 10 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली ( Amravati Lab Technician 10 Year Imprisonment ) आहे.

काय आहे प्रकरण?

24 जुलै 2022 रोजी बडनेरा येथील मोदी ट्रामा केअर या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एक युवती कोरोना चाचणी करण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत असणाऱ्या अल्केश देशमुख याने तरुणीची स्वॅब टेस्ट केल्यानंतर ती कोरोना पॉझिटिव्ह आली. मग आरोपीने पुन्हा एकदा बोलवत गुप्तांगातून चाचणी करावी लागेल, असे सांगितले.

तसेच, अल्केशने तरुणीला महिला सहकारी नसल्याचे सांगत तुम्हा मैत्रिणीला सोबत ठेवू शकता म्हणाला. हा प्रकार तरुणीने आपला भावाला सांगितला. त्यानंतर पीडितने अल्केश देशमुख विरोधात बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा -Scam of Housing Society : धक्कादायक! जालन्यात गृहनिर्माण संस्थेच्या नावावर 400 कोटींचा घोटाळा

Last Updated : Feb 3, 2022, 11:30 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details