महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नव्हे, केवळ मुंबईचे - News about C M Uddhav Thackeray

अमरावती भाजपने शेतकरी कर्ज माफी, महिला सुरक्षितता या विषीयावर राज्य सरकार विरोधात आदोलन केले. या वेळी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नसून ते फक्त मुंबईचे असल्याचा आरोप जिल्हा भाजपच्या वतीने करण्यात आला.

Amravati BJP alleged that the C M was not from Maharashtra but only from Mumbai
मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नव्हे, केवळ मुंबईचे

By

Published : Feb 25, 2020, 4:22 PM IST

अमरावती - संकटात सापडलेला शेतकरी आज रडतो आहे. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहेत. त्यांना दिवसा भररस्त्यात पेटविले जात आहे. सध्या राज्यात काही एक ठीक नाही आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहे की नाही, असा प्रश्न भेडसावतो आहे, स्वतःला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणवणारे उद्धव ठाकरे यांचे वागणे कार्यपद्धतीही ते महाराष्ट्राचे नव्हे तर केवळ मुंबईचे मुख्यमंत्री आहेत अशीच असल्याचे जावणत आहे, असा आरोप अमरावती जिल्हा भाजपच्या वतीने करण्यात आला.

मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नव्हे, केवळ मुंबईचे

जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महा विकास आघाडी सरकार अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आघाडी सरकारच्या राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. त्याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यासह आज अमरावती शहरात राजकमल चौक येथे भाजप जिल्हा आणि शहर कार्यकारणीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

भाजपच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी आणि भाजपचे अमरावती शहर अध्यक्ष किरण पातुरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, माजी महापौर मिलिंद चिमोटे भाजपचे माजी शहराध्यक्ष तुषार भारतीय, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजपचे माजी शहराध्यक्ष जयंत डेहनकर त्यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. बारा वाजल्यापासून सुरू झालेले आंदोलन तीन वाजेपर्यंत चालले. यानंतर आंदोलक तहसील कार्यालयावर धडकले आणि त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या व कार्यक्षमतेच्या निषेधार्थ आपले निवेदन तहसीलदारांना सादर केले.

या आंदोलनासंदर्भात भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाटत नाहीत, ते केवळ मुंबई पर्यंतच मर्यादित आहेत. मुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा बारामती पर्यंतच मर्यादित आहे. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यासुद्धा कार्यक्षम मंत्री असून हिंगणघाट मध्ये महिला प्राध्यापक केला जाण्यात आल्याने त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले असताना यशोमती ठाकूर मात्र आपल्या तिवसा मतदारसंघात बॉडी बिल्डिंग स्पर्धेत रमल्या असल्याचा आरोप निवेदिता चौधरी यांनी' ईटीव्ही भारत'शी बोलताना केला. नागपुरात गुन्हेगारी वाढली म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विनाकारण आरोप करणारे आज संपूर्ण राज्यात गुन्हेगारी वाढली असताना गप्प बसले आहेत. त्याचाही आम्ही निषेध नोंदवतो असे निवेदिता चौधरी म्हणाल्या.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी राज्यमंत्री बच्चू कडू आज मंत्री असताना त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाहीत त्यांनी केवळ नौटंकी केली आणि नौटंकी मुळेच ते आज मंत्रीपद भोगत आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला. जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात माजी पालक मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी धरणे दिले धामणगाव रेल्वे येथे आमदार प्रताप अडसड नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात भाजपने छेडलेले आजचे धरणे आंदोलन यशस्वी झाले असल्याचे निवेदिता चौधरी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details