अमरावती -सर्विस बुकवर वेतन निश्चितीसाठी सहयोगी प्राध्यापक अशी नोंद करण्यात आली. यासाठी सहयोगी प्राध्यापक पदाचा प्रस्ताव मंजूर करण्यास तीस हजार रुपयांची लाच स्वीकारणारे अमरावती विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मुरलीधर वाडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. उच्च शिक्षण सहसंचालक यांच्या या प्रतापामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
असे आहे संपूर्ण प्रकरण -अमरावती विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मुरलीधर वाडेकर यांच्याकडून सहयोगी प्राध्यापक या पदासाठी वेतन निश्चिती सर्विस बुक वर नोंद तसेच सहयोगी प्राध्यापक या पदासाठी प्रस्ताव मंजूर करण्यास तीस हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 29 जून रोजी दाखल झाली होती. शुक्रवारी दुपारी ठरल्याप्रमाणे उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर मुरलीधर वाडेकर यांनी संबंधितांकडून तीस हजार रुपयांची लाच स्वीकारली. याचवेळी दबाधरुन बसलेल्या लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगीहात ताब्यात घेतले. या प्रकरणात उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मुरलीधर वाडेकर यांच्या विरोधात गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.