महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amravati Murder Case : डॉक्टर युनूस खान बहादूर खानला चार दिवसांची पोलीस कोठडी - Khan In Police Custody

अमरावती शहरातील औषधी विक्रेता उमेश कोल्हे हत्या प्रकरणात ( Drug Dealer Umesh Kolhe Murder Case ) पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केलेला डॉ. युसुफ खान याला जिल्हा व सत्र न्यायालयाने 6 जुलै पर्यंत पोलीस कोठडी ( Yusuf Khan To Police Custody ) सुनावली आहे. या प्रकरणात अन्य एक आरोपी अतीब रशीद आदिल रशीद याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे.

yunis khan got pcr
yunis khan got pcr

By

Published : Jul 2, 2022, 7:14 PM IST

अमरावती - शहरातील औषध विक्रेता उमेश कोल्हे हत्या प्रकरणात ( Drug Dealer Umesh Kolhe Murder Case ) कोल्हे कुटुंबीयांनी पहिल्याच दिवशी खानबाबत व्यक्त केला होता. औषध विक्रेता उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी रात्री साडेदहा वाजता श्याम चौक परिसरातील घंटी घड्याळ लगत गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहर हादरली असून उमेश कोल्हे यांनी एका व्हाट्सअप ग्रुप वर त्यांना नुपूर शर्मा संदर्भात आलेल्या दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यामुळेच ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

युनूस खानला चार दिवसांची पोलिस कोठडी

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर केली पोस्ट -वॉट्सअॅप ग्रुपमध्ये या पोस्ट शेअर करण्यात आल्या होत्या. त्या ग्रुपमध्ये डॉक्टर युनूस खान हा देखील होता. व्हेटर्नरी डॉक्टर असणारा युनूस खान हा उमेश कोल्हे यांच्या औषधी दुकानातून नियमित औषधी घ्यायचा. डॉक्टर युनूस खान याला कोल्हे कुटुंबीयांनी अनेकदा आर्थिक मदत केल्याची माहिती देखील पुढे आली आहे. उमेश कोल्हे यांची हत्या झाल्यावर कोल्हे कुटुंबीयांनी सर्वात आधी डॉक्टर युनूस खान याच्याबाबतच संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी युनूस खानला शुक्रवारी रात्री अटक केली. आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

हेही वाचा -Amravati Chemist Murder : उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांबाबत केलेल्या पोस्टमुळेचं; पोलीस उपायुक्तांनी केलं स्पष्ट

ABOUT THE AUTHOR

...view details