अमरावती -कोरोनाच्या तिसऱ्या लाटीची शक्यता आणि ओमायक्रॉनचे वाढते ( Omicron In Maharashtra ) रुग्ण या पार्श्वभूमीवर आजपासून 15 ते 18 वर्षे ( Amravati 15 To 18 Age Group Vaccination ) वयोगटातील मुलांचे करण्यात येत आहे. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी अमरावती जिल्ह्यात 40 केंद्रांवर ( Amravati Children Vaccination Centers ) 15 ते 18 वर्ष वयोगटाताली मुलांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला.
155 केंद्रांवर दिली जाणारी लस -
अमरावती जिल्ह्यात एकूण 155 केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. आज पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 40 केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे या केंद्रांवर 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींना लस देण्यात आली. अमरावती शहरात सबनीस प्लॉट, विलासनगर, बिच्छू टेकडी, बडनेरा आणि दसरा मैदान येथील महापालिकेच्या रुग्णालयात आजपासून लसीकरणाला सुरुवात झाली. या लसीकरण केंद्रांवर 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींचे व त्यांच्या पालकांची गर्दी उसळली होती.
शासकीय केंद्रांवर लसीकरण मोहीम -
15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात 35 आणि महापालिका क्षेत्रात पाच अशा 40 केंद्रांवर लाच दिली जात आहे. हे सर्व केंद्र शासकीय केंद्र असून यानंतर शाळा महाविद्यालय आणि आश्रम शाळांमध्ये सुद्धा केंद्र सुरू केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.