महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवरात्रोत्सवासाठी अमरावती सज्ज; अंबादेवी-एकवीरा देवीच्या उत्सवाला रविवारपासून सुरुवात - अमरावती अंबादेवी मंदिर

अमरावतीत नवरात्र उत्सवानिमित्त अंबादेवी आणि एकवीरा देवी ही दोन्ही मंदिरे रोषणाईने उजळून निघाली आहेत.

अंबादेवी मंदिर

By

Published : Sep 28, 2019, 10:25 PM IST

अमरावती -शहराची आराध्यदैवत असणाऱ्या अंबादेवी आणि एकवीरा देवीच्या नवरात्रोत्सवाला रविवारपासून सुरुवात होत आहे. नवसाला पावणाऱ्या या दोन्ही देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण नवरात्र काळात सुमारे 12 लाख भाविक दर्शन घेणार आहेत. नवरात्र उत्सवानिमित्त अंबादेवी आणि एकवीरा देवी ही दोन्ही मंदिरे रोषणाईने उजळून निघाली आहे.

अंबादेवी मंदिरातील नवरात्रोत्सवाची माहिती देताना अंबादेवी संस्थानचे सचिव डॉ. अतुल आळशी आणि ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

रविवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्री उत्सवासाठी अंबादेवी मंदिरापासून गांधी चौक ते राजकमल चौक नवरीसारखा सजला आहे. रविवारी पहाटे अंबादेवी आणि एकवीरा देवी या दोन्ही मंदिरात अभिषेक केला जाणार आहे. तसेच भगव्या झेंड्याची पूजा केली जाणार आहे. या पूजनानंतर नवरात्र उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. नवरात्री उत्सवादरम्यान दोन्ही मंदिरात देवीच्या दर्शनासाठी पुरुष आणि महिलांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. या उत्सवादरम्यान मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.

हेही वाचा -नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूर सज्ज; अंबाबाई मंदिर सजले

नवरात्री उत्सवाच्या नऊही दिवस पहाटे 4 वाजल्यापासून या मंदिरात भाविकांची गर्दी असते. अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून तसेच लगतच्या अकोला,नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक अंबादेवी आणि एकवीरा देवीची ओटी भरण्यासाठी अमरावतीत येतात.

नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी २ तास अंध-अपंग आणि तपोवन येथील कुष्ठरोग्यांसाठी आंबा देवीच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच उत्सवा दरम्यान गांधी चौक ते राजकमल चौक पर्यंत मोठी यात्रा भरते. त्यामुळे नऊही दिवस आंबा गेटपासून राजकमल चौकपर्यंत वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

हेही वाचा -अमरावती जिल्ह्यातील नवरात्र उत्सवाला बंगाली टच; 'हे' कुटुंब बनवते सुबक मूर्ती

नवमीला अंबादेवी आणि एकविरा या दोन्ही देवींच्या मंदिरात होम-हवन आयोजित करण्यात येतो. तसेच महाप्रसाद वितरित केला जातो. दसऱ्याच्या दिवशी अंबादेवी पालखीत स्वार होऊन सीमोल्लंघन करते. नवरात्रीचा हा संपूर्ण काळ अंबादेवी मंदिर परिसरासह संपूर्ण अमरावती शहरात उत्साह आणि आनंददायी असतो, अशी माहिती भाविकांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details