अमरावती -अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अप्परवर्धा धरणाचे सर्व 13 दारे उगडण्यात आली आहेत. ( Gates Of Apparwardha Dam Were Opened ) येथी वर्धा नदीला पूर आला आहे, धरण परिसरात सदवदूर पाणीच पाणी दिसत असून या वर्धा नदी काठी वसलेल्या गावांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.
अप्परवर्धा धरणाची सर्व दारे उघडली पुरामुळे दोन मार्ग बंद -अप्पर वर्धा धरणाचे सर्व तेरादारी उघडण्यात आल्यामुळे वर्धा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असताना मोर्शी ते आष्टी आणि कवडण्यपुर ते आर्वी हे दोन मार्ग पाण्याखाली बुडाल्यामुळे ह्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा -जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना पूर आला असून, नदी नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. वरुड तालुक्यात जरूड, सातनूर आणि बहादा गावाला पुराचा तडाखा बसला असून, या गावातील अनेक घरं वाहून गेली आहेत. ज्या भागात पूर सदृश्य स्थिती आहे त्या भागात जिल्हा आपत्ती पथक पोहोचले आहे.
हेही वाचा -महाराष्ट्रात सत्ता, बिहार गमावणार?, नितीश कुमारांचा सोनिया गांधींना फोन; जेडीयू, काँग्रेस, आरजेडी युतीची शक्यता