अमरावतीमेळघाटातील आदिवासी बांधवांना आज देखील डॉक्टर आणि दवाखान्यावर विश्वास नाही. येथे कुपोषण आणि माता मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. शासकीय वैद्यकीय यंत्रणा आणि अनेक स्वयंसेवी संस्था या भागात प्रामाणिकपणे काम करत असली, तरी आदिवासी बांधवांचा superstitions in Melghat विश्वास हा बाबा आणि भूमिका यांच्यावरच अधिक आहे. मेघाचे आरोग्य सुदृढ व्हावे, Ajit Pawar Melghat Visit यासाठी या भागात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रबोधनाची अत्यंत गरज असल्याचे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवारांनी 3 गावांची केली पाहणीमेघाटातील कुपोषणाचा प्रश्न जाणून घेण्यासाठी आज अजित पवार यांनी मेळघाटात धारणी तालुक्यात येणाऱ्या दिदम्बा, कळमखार आणि नारवाटी या 3 गावांना भेट देऊन गावातील कुपोषित बालकांची पाहणी करून या कुपोषित बालकांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली आहे. या भागात आदिवासी बांधव पारंपारिक पद्धतीने त्यांच्या शेतात घेत असलेले धान्य आता घेऊ शकत नाही. Ajit Pawar Melghat Visit ही प्रमुख अडचण आदिवासी बांधवांनी बोलून दाखवल्याचे अजित पवार म्हणाले. मेळघाटातील पौष्टिक धान्य आदिवासी बांधवांना घेता यावे. यासाठी कृषी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून यासंदर्भात अधिवेशन काळात शासनाला सुद्धा माहिती दिली जाईल, असे अजित पवार म्हणाले.