अमरावती- राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ ऑगस्टपासून राज्यव्यापी महाजनादेश यात्रा काढणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील गुरूकुंज मोझरी येथून मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला सुरुवात होईल. विशेष म्हणजे यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
कृषीमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेच्या स्थळाची केली पाहणी; भाजपचे अध्यक्ष अमित शाह राहणार उपस्थित - gurukunj mojhari
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील गुरूकुंज मोझरी येथून मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला सुरुवात होईल. विशेष म्हणजे यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
कृषीमंत्री अनिल बोंडे
भाजपची ही महाजनादेश यात्रा राज्यातील ३६ पैकी ३० जिल्ह्यात पोहोचेल. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व कृषीमंत्री अनिल बोंडे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी जागेची पाहणी केली. या ठिकाणी संपूर्ण जागेची तसेच नियोजित कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री अनिल बोंडे यांच्यासोबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महसूल अधिकारी उपस्थित राहणार होते.