अमरावती -भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा ( nupur sharma controversial Statement ) आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद या देशाच्या विविध भागात उमटत असताना अमरावती शहरात काही भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राज्य राखीव पोलीस दल तैनात -अमरावती शहरातील चित्रा चौक परीसरात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. यासह टांगा पाडा परिसरातही पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एकूण शहरात शांततेचे वातावरण आहे.