महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amravati Violence : परिस्थिती पाहून संचारबंदी व इंटरनेटबाबद निर्णय घेणार - अतिरिक्त पोलीस महासंचालक - अमरावती इंटरनेट बंद

अमरावती शहरात हिंसाचार झाला होता. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात संचारबंदी(Curfew in Amravati city) लागू करण्यात आली आहे. तसेच इंटरनेट सेवाही(Internet Off) बंद करण्यात आली आहे. त्यामुळे परिस्थिती पाहून संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

adgp Rajendra Singh
अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग

By

Published : Nov 16, 2021, 6:07 PM IST

Updated : Nov 16, 2021, 7:20 PM IST

अमरावती - हिंसाचाराच्या(Amravati Violence) पार्श्वभूमीवर अमरावती शहरात संचारबंदी(Curfew in Amravati city) लागू करण्यात आली आहे. तसेच इंटरनेट सेवाही(Internet Off) बंद करण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून शहरात संचारबंदी व इंटरनेट बंदआहे. आज(16 नोव्हेंबर) संचारबंदी शिथील करून इंटरनेट सेवा सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, सध्यातरी संचारबंदी शिथील करण्यास पोलीस प्रशासनाने नकार दिला आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग
  • 35 गुन्हे दाखल, 188 जणांना अटक -

आज(16 नोव्हेंबर) अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग(ADGP Rajendra Singh) यांनी पत्रकारांशी संवाद साधला यात त्यांनी परिस्थिती पाहूनच संचारबंदी हटवण्यात येईल अशी माहिती दिली. जशी शहरात परिस्थिती राहील तसे सर्व सुरळीत करू, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत अमरावती हिंसाचार प्रकरनी 35 गुन्हे दाखल झाले असून, 188 आरोपींना अटक करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्यातरी अमरावतीत संचारबंदी हटवणे व इंटरनेट सुरू करण्याबाबद दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. या हिंसाचारामध्ये प्रत्येक आरोपीची ओळख करून त्याला अटक करण्यात येईल, असंही अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी सांगितले आहे.

  • दोन दिवसांत 40 लाख रुपयांचे नुकसान -

अमरावती शहरात दोन दिवस झालेल्या हिंसाचारात तब्बल 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  • शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात-

त्रिपुरा राज्यात कथित अत्याचाराविरोधात अमरावतीत (Amravati violence) 12 नोव्हेंबरला दुपारी एका समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 ते 20 हजार लोकांसह निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण मिळाले होते. यात शहरातील पाच ते सात दुकानांची तोडफोड झाली व काही दुकानदारांना मारहाण करण्यात आली. याच्या निषेधार्थ 13 नोव्हेंबरला भाजपकडून अमरावतीत बंद पुकारण्यात आला होता. या बंदलाही हिंसक वळण लागल्याचे चित्र बघायला मिळाले. सध्या(16 नोव्हेंबर) अमरावती शहरातील वातावरण शांत आहे. मोठा पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे.

Last Updated : Nov 16, 2021, 7:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details