महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

देशभरात तरुणींची फसवणूक केलेला ठग अमरावती पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हा दाखल - अमरावती गुन्हे वृत्त

बी-टेक केल्यानंतर अमेरिकेत शास्त्रज्ञ पदावर नोकरी केल्याचे सांगून एका ठगाने तरुणीचे लैंगिक शोषण केले आहे. संबंधित तरुणाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गाडगेनगर हद्दीत उघडकीस आला. आरोपीने यापूर्वी हैद्राबाद, बंगळुरू, तामिळनाडू, अलिगढ, कलकत्ता येथील अनेक युवतींची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

amravati police news
देशभरात तरुणींची फसवणूक केलेला ठग अमरावती पोलिसांच्या जाळ्यात; शारीरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

By

Published : Aug 27, 2020, 2:49 PM IST

अमरावती :बी-टेक केल्यानंतर अमेरिकेत शास्त्रज्ञ पदावर नोकरी केल्याचे सांगून एका ठगाने तरुणीचे लैंगिक शोषण केले आहे. संबंधित तरुणाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गाडगेनगर हद्दीत उघडकीस आला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी शेख शुभान शेख शरिफ ऊर्फ शहनशाह शेख शरीफ याच्या विरोधात लैंगिक शोषणासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी संतोषनगर, हैद्राबादचा आहे.

आरोपीने 'जीवनसाथी डॉट कॉम'वरून तरुणीशी संपर्क साधून लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी शेख शुभानने तरुणीला सांगितले की तो अविवाहित असून हैद्राबादमध्ये वास्तव्यास आहे. बी-टेक केल्यानंतर शास्त्रज्ञ म्हणून अमेरीकेत नोकरी केल्याची थाप त्याने मारली. त्यामुळे तरुणीने शेख शुभानची सगळी माहिती तपासून लग्नाचा निर्णय घेतला. लॉकडाऊन दरम्यान शेख शुभान तरुणीच्या घरीच राहत होता. दरम्यान त्याने ईच्छेविरुद्ध शारीरिक संबध प्रस्थापित केल्याचे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. आ

आरोपीने यापूर्वी हैद्राबाद, बंगळुरू, तामिळनाडू, अलिगढ, कलकत्ता येथील अनेक युवतींची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी शेख सुभानशेख शरीफ याच्यावर हैद्राबादमध्ये बलात्कार आणि 7 मोबाइल चीटिंगचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीला गाडगे नगर पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर आता 29 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details