अमरावती - जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवारी निमोनियामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र, आता त्या व्यक्तीची चाचणी अहवाल प्राप्त झाला असून त्याला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेला हा पहिला रुग्ण आहे. यापूर्वी जिह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मृत हा 45 वर्ष वयाचा असून तो हतीपुरा येथील रहिवासी आहे.
कोरोनामुळे अमरावतीत पहिला बळी - amravati death
अमरावती जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेला हा पहिला रुग्ण असून यापूर्वी जिह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मृत हा 45 वर्ष वयाचा असून तो हतीपुरा येथील रहिवासी होता.
22 मार्चला तो आजारी पडल्यावर त्याच्यावर डॉ. बारी यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला निमोनिया असल्याचे निदान झाले होते. गुरुवारी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याचा स्वब तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आला होता. स्वब चाचणी अहवाल प्राप्त झाला असून तो मृत्यू कोरोनाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Conclusion: