अमरावती -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (बुधवारी) जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल 96.34 टक्के इतका लागला आहे. विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील विज्ञान शाखेचा सर्वाधिक म्हणजेच 98.67 टक्के इतका निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत अमरावती 22.2 52 टक्के, अकोला 20. 98 टक्के, बुलढाणा 15. 78 टक्के तर वाशिम जिल्ह्याचा 12.31 टक्के निकाल लागला आहे.
प्रतिक्रिया देताना अधिकारी कला शाखेत वाशिम जिल्हाने मारली बाजी :अमरावती विभागात कला शाखेत एकूण 72.53 झाले असून वाशिम जिल्ह्याचा निकाल 85.27 इतका लागला आहे. कला शाखेत अकोला जिल्ह्याचा निकाल 69.38 टक्के, यवतमाळ 68. 87, अमरावती 70.89, तर बुलढाणा जिल्ह्याचा 70.55 टक्के निकाल लागला आहे.
वाणिज्य शाखेतही वाशिम जिल्हा अव्वल :बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागात एकूण 71.59 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी वाशिम जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 88.88 टक्के इतका लागला आहे. अमरावती 77.14 टक्के, अकोला 68 टक्के, यवतमाळ 58 टक्के तर बुलडाण्याचा 58.82 टक्के इतका निकाल लागला आहे.
17 जूनला मिळणार गुणपत्रिका :बारावीचा निकाल घोषित झाला असून विद्यार्थ्यांना आपले गुण ऑनलाइन पाहता येणार असून त्याची प्रिंटही घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका मात्र 17 जून रोजी त्यांच्या महाविद्यालयात मिळतील, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अमरावती विभागीय सचिव उल्हास नारळ यांनी दिली आहे.
हेही वाचा -12th Class Result : बारावीचा निकाल जाहीर, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्याचा जल्लोष