महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Navaratri 2022: नवदुर्गोत्सवात यंदा 'या' जिल्ह्यात होणार तब्बल ४१,००१ किलोचा बुंदीचा लाडू

अमरावती येथे सराफा स्थित सार्वजनिक नवदुर्गोत्सव ( Public Navdurgotsav Mandal Amravati ) मंडळाच्या वतीने या वर्षी नवरात्रोत्सवमध्ये ४१००१ किलोचा बुंदीचा लाडू ( 41,001 Kg Of Bundi Ladoo ) तयार करण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. ( As Many As 41,001 Kg Of Bundi Ladoo This Year In Navadurgo Festival Of Amravati )

By

Published : Sep 16, 2022, 4:35 PM IST

41,001 Kg Of Bundi Ladoo
४१,००१ किलोचा बुंदीचा लाडू

अमरावती: सराफा स्थित सार्वजनिक नवदुर्गोत्सव मंडळाच्या वतीने या वर्षी नवरात्रोत्सवमध्ये ४१००१ किलोचा बुंदीचा लाडू ( 41,001 Kg Of Bundi Ladoo ) तयार करण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. १९७३ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या मंडळाने आजपर्यंत विविध समाजपयोगी उपक्रम रावल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. ( Bundi Ladoo in Amravati )

अनेक मान्यवरांनी मिळवून दिला नामलौकीक -४९वर्षा पुर्वी स्थापन झालेल्या या सार्वजनिक नवदुर्गोत्सव मंडळाचे पहिले अध्यक्ष खुशालसिंग मुणोत होते. त्यानंतरच्या काळात ओमप्रकाश चांडक, लालचंद भंसाली, प्रकाश कोचर, विजय शेटे, रमेश पंचवटे, दिनेश बाहेती यांनी अथक प्रयत्न करून या मंडळाला ( Navratra Festival in Amravati ) नावलौकिक मिळवून दिला.



आजपर्यंत मंडळाने सादर केले विविध देखावे -मंडळाकरिता कलकत्ता येथील मूर्तिकारांनीच देवीची मूर्ति साकारली. आतापर्यंत कल्पना चावलाचा अंतराळ देखावा, जयपुरी गेट, शीशमहल, पृथ्वीराज चव्हाण यांच्या रणभूमीचा देखावा, राजा मल्हार तानसेन, ९ देवीचेदर्शन इत्यादी देखावे तयार करण्यात आले. मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर, बडनेरा रेल्वे स्टेशनवर पाणपोई, अतिवृष्टीमध्ये सानुग्रह मदत करण्यात येते. मंडळाच्या वतीने गत २५ वर्षापासून दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकरिता ५ दिवस महाप्रसादाचे वितरण केले जाते.



सार्वजनिक नवदुर्गोत्सव मंडळाचा उपक्रम -यावर्षी भाविक भक्तांकरिता वेगळा उपक्रम म्हणून मंडळाने ४१००१ किलोचा बुंदिचा लाडू बनविण्याचा निर्णय घेतला. या लाडूचे भाविक भक्तांना प्रसाद म्हणून वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे लालचंद भंसाली, ओमप्रकाश चांडक यांनी दिली. पत्रकार परिषदेमध्ये श्रीप्रकाश झंवर, राजू पारेख, प्रवीण हरमकर, गोलु पाटील, सिमेश श्रॉफ, घनश्याम वर्मा, रंजन महाजन, दीपक डाबी, राजेंद्र भंसाली, मोहन अग्रवाल, अखिलेश खडेकार उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details