महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमरावतीजवळ रुळावरून घसरले कोळशाने भरलेल्या मालगाडीचे 18 डबे

बल्लार्श येथून कोळसा घेऊन निघालेली इंजिन क्रमांक 2380 आणि 23432 ही मालगाडी वालगाव स्थानकावर बराच वेळ थांबली होती. 12.30 वाजता सिग्नल मिळाल्यावर ही गाडी भरधाव वेगात चांदुरबाजारच्या दिशेने निघाली. दरम्यान, इंजिपासून पाचव्या ते बावीसव्या क्रमांकाचे डबे रुळखाली घसरले.

अमरावती रेल्वे अपघात
अमरावती रेल्वे अपघात

By

Published : Aug 15, 2021, 12:42 PM IST

अमरावती - शहरालगत बडनेरा-नरखेड मार्गावर पुसदा गावाच्या परिसरात भरधाव वेगात असणारी मालगाडी रुळावरून रात्री 12.45 मिनिटांनी घसरले. बल्लार्श येथून कोळसा भरून नरखेडकडे निघालेल्या 60 डब्यांच्या या गाडीचे 18 डबे रुळावर घसरून एकमेकांवर आढळले. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली.

वालगावला थांबा घेऊन गाडी निघाली समोर

बल्लार्श येथून कोळसा घेऊन निघालेली इंजिन क्रमांक 2380 आणि 23432 ही मालगाडी वालगाव स्थानकावर बराच वेळ थांबली होती. 12.30 वाजता सिग्नल मिळाल्यावर ही गाडी भरधाव वेगात चांदुरबाजारच्या दिशेने निघाली. दरम्यान, इंजिपासून पाचव्या ते बावीसव्या क्रमांकाचे डबे रुळखाली घसरले. यापैकी 7 डबे हे एकमेकांच्या वर चढले. मालगाडीचे चालक डी. एस. यादव यांनी अपघात होताच गाडीला कसेबसे सावरले. या गाडीत निर्मळ लोखंडे हे गार्ड म्हणून तैनात होते.

पहाटे 4पासून मार्ग सुरळीत करण्याचे काम

या मार्गावरून जाणाऱ्या नरखेड-भुसावळ पॅसेंजर आणि काचीगुडा एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आल्या. पहाटे चार वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. मनमाड आणि नरखेड येथून अपघात स्पेशल गाड्या अपघातस्थळी पोहोचल्या. चार जेसीबी अपघातस्थळी बोलविण्यात आले, पैकी एक जेसीबी सकाळी 8 वाजता पोचलो. मेळघाटातून 150 मजूर बोलविण्यात आले आहे. अपघातस्थळाजवळ जाण्यास सुरळीत मार्ग नसल्याने कामात काहीशा अडचणी येत आहेत. आज दिवसभरात हा मार्ग मोकळा करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. रेल्वे पोलिसांसह वालगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले.

ABOUT THE AUTHOR

...view details