अमरावती -महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (MSRTC Workers Strike) सुरू असल्यामुळे अमरावती आगारात (Amravati Bus Stand) 75 गाड्या आणि अमरावती आगार क्रमांक दोन बडनेरा (Badnera Busstand) येथे 55 गाड्या उभ्याच आहे. आता या गाड्या कधी धावतील याची प्रतीक्षा सर्वांनाच असताना या गाड्या आगाराबाहेर पडतील तेव्हा सुरळीत असाव्यात, यासाठी दोन्ही बसस्थानकावर या गाड्यांचे मेंटेनन्स केले जात आहे.
उभ्या असणाऱ्या गाड्यांची घेतली जात आहे काळजी -
अमरावती आगारामध्ये एकूण 75 गाड्या उभ्या आहेत, तर बडनेरा आगारात 55 गाड्या उभ्या आहेत. या गाड्या धावत नसल्यामुळे त्यांचे इंजन खराब होऊ नये, यासाठी डेपो मॅनेजर, आगार व्यवस्थापक तसेच वाहन परीक्षक सातत्याने काळजी घेत आहेत. दिवसातून दोन वेळा या या सर्व गाड्या चालू करून बंद केल्या जात असल्याची माहिती संपातून माघार घेऊन कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
तीन गाड्यांची बॅटरी लो -
अमरावती आगारात उभ्या असणाऱ्या 75 पैकी 3 गाड्यांची बॅटरी लो झाली आहे. इतर गाड्या मात्र सुव्यवस्थित आहेत. सर्व गाड्यांची बॅटरी नियमित तपासली जात आहे. लॉकडाऊनच्या काळातही आगारातील सर्व गाड्यांच्या मेंटेनन्सवर आम्ही लक्ष देत होतो, असे अमरावती आगारातील अभियंत्यांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. संपातून माघार घेऊन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना माध्यमांशी बोलण्यास वरिष्ठांनी बंधने घातली असल्याचेही सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
तीस कर्मचाऱ्यांची संपातून माघार -