अकोला - देशाचे संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजपला मतदान म्हणजे संविधानाच्या विरोधात मतदान, असे म्हणून काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपला मतदान म्हणजे संविधान विरोधात मतदान - खर्गे अकोट येथील काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्या निवडणूक प्रचार सभेत ते आज दुपारी बोलत होते. या सभेला हिदायत पटेल, आशिष दुवा, बबनराव चौधरी, अनंतराव देशमुख, वसंत पुरके, रामदास बोडखे, सुधाकर गणगणे, मदन भरगड, संग्राम गावंडे, डॉ. अभय पाटील, लक्ष्मण तायडे, अझहर हुसेन, संतोष कोरपे, मुकुंद खैरे, रमाकांत खेतान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, की तत्व आम्ही सोडत नाही. आम्ही कुण्याही व्यक्तीविरोधात लढत नाही. आम्ही देशाची लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत. संविधान वाचविण्यासाठी ही निवडणूक लढत आहोत. देशाला सुरक्षित करणे, देशात एकता ठेवण्याची गोष्ट करा. ते म्हणता काँग्रेसने देशाला सत्तर वर्षात बरबाद केले. संविधानावर आघात करू पाहणारी भाजप संविधानामुळेच संसदेच्या पहिल्या बेंचवर बसली आहे.
विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत आहे. ही स्थिती मोदींनी आणली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना देशातील ७२ हजार कोटींचे कर्ज आम्ही शेतकऱ्यांचे माफ केले आहे. देशात एकता राखण्यासाठी काँग्रेसने बलिदान दिले आहे. भाजप सत्तेसाठी जन्मलेली आहे. मोदीजी काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले असे विचारतात. आम्ही त्यांना म्हटले आहे, त्या ७० वर्षातील अटल बिहारी वाजपेयी यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ तरी काढा. भाजप आणि आरएसएसचा देशासाठी एक व्यक्ती शहीद झाला नाही. पाकिस्तानला आम्ही भेटलो असतो तर 'जय जवान जय किसान' चा नारा देऊ शकलो नसतो' असा टोलाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. काँग्रेसचे लोकं हे देशभक्त आहेत, असा विश्वासही काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आपल्या भाषणातून व्यक्त केला. यावेळी वसंत पुरके, हिदायत पटेल, संग्राम गावंडे यांच्यासह आदी मान्यवरांची भाषणे झालीत.