महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Today Gold Silver Rate: आठवड्याच्या सुरूवातीला 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत काय बदल, घ्या जाणून

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थीरता लक्षात घेता, पुढील काळात सोने,चांदीचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. सोने- चांदीमध्ये अनेक जण गुंतवणूक करत असतात. त्यामुळे पुढील काळात भाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर आज 24 कॅरेट सोन्याचा दर ₹57,380 इतका आहे. तर चांदीचा दर हा ₹70,500 आहे.

Today Gold Silver Rate
सोने चांदीचे दर

By

Published : Feb 13, 2023, 7:37 AM IST

मुंबई : 24 कॅरेट सोन्याचा दर ₹57,380 रूपयांवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर ₹52,600 रूपयांवर आला आहे. गेल्या आठवड्यात सोने ५७,२०० च्या वर गेले होता. तथापि, वायदे बाजारात तो अजूनही मजबूत आहे. तरशहरांमध्ये आजचा सोन्याचा दर काय आहे जाणून घेऊया. 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,260, 8 ग्रॅम ₹42,080, 10 ग्रॅम ₹52,600, 100 ग्रॅम ₹5,26,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,73, 8 ग्रॅम ₹45,904, 10 ग्रॅम ₹57,380, 100 ग्रॅम ₹5,73,800 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,400, मुंबईत ₹52,600 दिल्लीत ₹52,750 कोलकाता ₹52,600 हैदराबाद ₹52,600 आहेत. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे.

चांदीचे आजचे दर : आज चांदी 1 ग्रॅम ₹70.50 , 8 ग्रॅम ₹564, 10 ग्रॅम ₹705, 100 ग्रॅम ₹7,050, 1 किलो ₹70,500 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹727, मुंबईत ₹705, दिल्लीत ₹705, कोलकाता ₹705 , बंगळुरू ₹727, हैद्राबाद ₹727 आहेत. सोन्या-चांदीच्या दरात झालेली वाढ ग्राहकांना परवडत नसल्याने अनेक ग्राहकांनी सोने खरेदीसाठी वेट अन वॉचची भूमिका घेतली आहे. सुवर्णनगरी जळगावमध्येही सोन्याचे दर तब्बल 59 हजारांच्या घरात पोहोचले आहेत. सोन्याचे हे वाढलेले दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि राजधानी दिल्लीसह इतर ठिकाणीही कमी-जास्त प्रमाणात व्यवहार करतात. काल एक किलो चांदीचा दर 71,520 रूपयांवर आला आहे. सोन्याच्या दरात तब्बल 2,700 रूपयांची वाढ झाली आहे.

सोने चांदीचे दर

चांदीचा शोध:सुमारे 4000 वर्षांपूर्वी बनवलेल्या चांदीच्या वस्तू सापडल्या आहेत. सोने आणि तांब्याप्रमाणे, चांदी देखील निसर्गात शुद्ध स्वरूपात आढळू शकते. म्हणूनच चांदीच्या शोधात शुद्ध चांदीचे तुकडे नदीच्या पात्रात किंवा इतरत्र सापडले असावेत.तर गुंतवणूक म्हणूनही अनेकजण सोने चांदीकडे पाहतात. सोने चांदीच्या दागिन्यांच्या आकर्षणामुळे नागरिकांचा ते खरेदी करण्याकडे ओढा असतो. त्यामुळे त्याच्या किमतींमध्ये सातत्याने आपल्याला चढउतार पहायला मिळतो. सोने चांदीचे दर कमी झालेले आहेत. तरीही दर कमी झाल्यावर दागिने खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. त्यामुळेच या दरांवर प्रत्येकाचे लक्ष असते.

हेही वाचा: Today Gold Silver Rate सोने चांदीचे दर वधारले काय आहेत आजचे दर

ABOUT THE AUTHOR

...view details