महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Vegetables rates today : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पातीचा कांदा व तोंडलीचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

भाजीपाला हा दैनंदिन जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. ( APMC market navi mumbai ) भाजीपाल्याच्या किमती दररोज ( Vegetables Rates today) बदलत राहतात. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत, ते जाणून घेऊया. ( Vegetables Rate Today in APMC Market )

Vegetables rates today
भाज्यांचे दर

By

Published : Jan 9, 2023, 10:40 AM IST

नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्याप्रमाणे पातीच्या कांद्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. ( Vegetables Rate Today in APMC Market )







भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ५६०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १६०० रुपये ते २००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३२०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २६०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६०० रुपये इतकी किंमत आहे. ( APMC market navi mumbai )


शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
१८०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाण ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २४०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये इतकी किंमत आहे.

पालेभाज्या :कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते ६००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १४०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १२०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये इतकी किंमत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details